सीबीएसई बोर्ड बारावीच्या परीक्षेत मुलींची बाजी, मेघना श्रीवास्तव देशात अव्वल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 04:44 PM2018-05-26T16:44:23+5:302018-05-26T16:48:40+5:30

‘सीबीएसई’मार्फत दि. ५ मार्च ते २७ एप्रिल या कालावधीत परिक्षा घेण्यात आली होती. शनिवारी दुपारी बारा वाजता आॅनलाईन पध्दतीने निकाल जाहीर करण्यात आला.

once agiain girls topper in CBSE board HSC examinations, Meghna Srivastava first in country | सीबीएसई बोर्ड बारावीच्या परीक्षेत मुलींची बाजी, मेघना श्रीवास्तव देशात अव्वल 

सीबीएसई बोर्ड बारावीच्या परीक्षेत मुलींची बाजी, मेघना श्रीवास्तव देशात अव्वल 

googlenewsNext
ठळक मुद्देया परीक्षेसाठी देशभरातून ११ लाख ८४ हजार ३८६ विद्यार्थ्यांनी नोंदणी एकुण ९ लाख १८ हजार ७६३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ८३.०१ टक्के परीक्षेचा निकालमंडळाच्या दहा विभागांमध्ये त्रिवेंद्रम विभागाचा निकाल सर्वाधिक ९७.३२ टक्के

पुणे : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळा (सीबीएसई) मार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर करण्यात आला. या परीक्षेत यंदाही मुलींनीच बाजी मारली असून गाझियाबाद येथील मेघना श्रीवास्तव हिने ५०० पैकी ४९९ गुण मिळवत देशात पहिला क्रमांक पटकावला. पहिल्या तीनही क्रमांकावर मुलींचाच दबदबा राहिला आहे. परीक्षेच्या एकुण निकालाची टक्केवारी ८३.०१ एवढी आहे.
‘सीबीएसई’मार्फत दि. ५ मार्च ते २७ एप्रिल या कालावधीत परिक्षा घेण्यात आली होती. शनिवारी दुपारी बारा वाजता आॅनलाईन पध्दतीने निकाल जाहीर करण्यात आला. या परीक्षेसाठी देशभरातून ११ लाख ८४ हजार ३८६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ११ लाख ६ हजार ७७२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. एकुण ९ लाख १८ हजार ७६३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ८३.०१ टक्के परीक्षेचा निकाल लागला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत हा निकाल एक टक्क्यांनी अधिक आहे. एकुण विद्यार्थ्यांपैकी ८८.३१ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या असून मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ७८.९९ एवढी आहे. मुलींच्या तुलनेत मुलांचे उत्तीर्णतेचे प्रमाण ९.३२ टक्क्यांनी कमी आहे. एकुण उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी १२ हजार ७३७ विद्यार्थ्यांना ९५ टक्क्यांहून अधिक तर ७२ हजार ५९९ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत.
गाझियाबाद मधील स्टेप बाय स्टेप शाळेतील मेघना श्रीवास्तव हिने ९९.८ टक्के गुण मिळाले आहेत. इंग्रजी वगळता तिला सर्व विषयांमध्ये १०० पैकी १०० गुण मिळाले आहेत. तर इंग्रजीमध्ये तिला ९९ गुण मिळाले. गाझियाबाद येथीलच अनुष्का चंद्रा हिला मेघनापेक्षा केवळ १ गुण कमी मिळाला असून ती ९९.६ टक्के गुणांसह देशात दुसरी आली आहे. तिसºया क्रमांकावर सात जण असून त्यांना प्रत्येकी ४९७ म्हणजे ९९.४ टक्के गुण मिळाले आहेत. चाहत बोधराज, आस्था बाम्बा, तनुजा काप्री, सुप्रिया कौशिक, नकुल गुप्ता, क्षितीज आनंद व अनन्या सिंग अशी त्यांची नावे आहेत. मंडळाच्या दहा विभागांमध्ये त्रिवेंद्रम विभागाचा निकाल सर्वाधिक ९७.३२ टक्के लागला आहे. त्याखालोखाल चेन्नईचा ९३.८७ आणि दिल्ली विभागात ८९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 
 

Web Title: once agiain girls topper in CBSE board HSC examinations, Meghna Srivastava first in country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.