एकदा आयकर भरला, तरीही मिळणार पीएम किसानचा लाभ; केंद्र सरकारनं बदलले निकष

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2024 06:56 AM2024-02-13T06:56:33+5:302024-02-13T06:57:38+5:30

आयकर भरणारे शेतकरी, शासकीय कर्मचारी, अधिक उत्पन्न असलेल्या शेतकऱ्यांना लाभ नाकारला होता.

Once income tax is paid, PM Kisan benefits will still be available; Central government has changed the criteria | एकदा आयकर भरला, तरीही मिळणार पीएम किसानचा लाभ; केंद्र सरकारनं बदलले निकष

एकदा आयकर भरला, तरीही मिळणार पीएम किसानचा लाभ; केंद्र सरकारनं बदलले निकष

नितीन चौधरी

पुणे - पीककर्जासाठी विवरणपत्रे (फॉर्म १६) व आर्थिक विवरणपत्रे भरून घेतलेले शेतकरी आयकराच्या मर्यादेत आले. त्यामुळे पंतप्रधान किसान सन्मान योजनेत अशा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना मिळालेल्या लाभाची वसुली करण्यातही आली. मात्र, केंद्र सरकारने यात आता बदल केला असून, केवळ एकदा विवरणपत्र भरलेल्या शेतकऱ्यांना आता पूर्वीच्या थकलेल्या हप्त्यांसह फेब्रुवारीच्या अखेरीस देण्यात येणारा १६ वा हप्ताही मिळणार आहे. 

सरकारच्या निर्णयानुसार, आयकर भरणारे शेतकरी, शासकीय कर्मचारी, अधिक उत्पन्न असलेल्या शेतकऱ्यांना लाभ नाकारला होता. त्यांच्याकडून लाभ वसूल केला जात होता.

निकष बदलले...

केंद्राने आता या अटीत बदल केला आहे. त्यानुसार २०१९ पासून सलग दोन दोन वर्षे आयकर भरलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. मात्र, केवळ एकदाच आयकर भरल्यास शेतकऱ्यांना या योजनेत पात्र ठरविले. पंतप्रधान किसान सन्मान योजना ही कृषी विभागामार्फत राबवली जाते, मात्र आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांकडून लाभाची वसुली महसूल विभाग करत आहे. 

Web Title: Once income tax is paid, PM Kisan benefits will still be available; Central government has changed the criteria

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी