राज्यात दीड कोटी नागरिकांना लसीच्या दुसऱ्या डोसची प्रतीक्षा, दोन्ही डोस घेणारे फक्त ३५ लाख नागरिक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2021 07:48 AM2021-05-12T07:48:48+5:302021-05-12T07:49:15+5:30
१ मेपासून १८ ते ४४ वर्षे वयोगटातील लोकांचे लसीकरण सुरू झाले. मात्र लसच नसल्यामुळे या वयोगटात फक्त पाच लाख लोकांनाच पहिला डोस मिळू शकला आहे.
अतुल कुलकर्णी -
मुंबई : देशात सर्वाधिक लसीकरण झालेल्या महाराष्ट्रात एकूण १ कोटी ८४ लाख ०७ हजार ४६५ लोकांनी लसीचे एक किंवा दोन डोस घेतले आहेत. मात्र त्यानंतरही सर्व वयोगटातील मिळून १ कोटी ४९ लाख १० हजार २५८ लोकांना लसीचा दुसरा डोस देणे बाकी आहे. यात सर्वाधिक प्रमाण ४५ वर्षांवरील लोकांचे आहे. दोन्ही डोस घेणारे फक्त ३४ लाख ९७ हजार २०७ लोक आहेत.
१ मेपासून १८ ते ४४ वर्षे वयोगटातील लोकांचे लसीकरण सुरू झाले. मात्र लसच नसल्यामुळे या वयोगटात फक्त पाच लाख लोकांनाच पहिला डोस मिळू शकला आहे.
हेल्थ केअर वर्कर्स या गटात
११,३०,७५२ लोकांनी पहिला डोस घेतला असून, ६,७४,४५४ लोकांनी दुसरा डोस घेतला आहे. फ्रन्टलाईन वर्कर्स गटात १५,१८,६०० लोकांनी पहिला डोस घेतला. ६,३७,०१३ लोकांनी दुसरा डोस घेतला आहे. ४५ वर्षांवरील वयोगटात १ कोटी १७ लाख ५० हजार ३८८ लोकांना पहिला डोस मिळाला. त्यापैकी २१ लाख ८५ हजार ७४० लोकांना दुसरा डोस मिळाला आहे.
दुसरा डोस बाकी -
- ४,४६,२९८ हेल्थ केअर वर्कर्स
- ८,८१,५८७ फ्रन्टलाईन वर्कर्स