बालिकेवरील अत्याचार प्रकरणी एकास अटक
By admin | Published: April 10, 2016 02:17 AM2016-04-10T02:17:48+5:302016-04-10T02:17:48+5:30
आयेशानगर भागातील मदर आयेशा स्कूलमधील बालिकेवरील अत्याचार प्रकरणावरून शुक्रवारी झालेली दगडफेक, जाळपोळ, शासकीय वाहनांचे नुकसान केल्याप्रकरणी जमावाविरूद्ध
मालेगाव : आयेशानगर भागातील मदर आयेशा स्कूलमधील बालिकेवरील अत्याचार प्रकरणावरून शुक्रवारी झालेली दगडफेक, जाळपोळ, शासकीय वाहनांचे नुकसान केल्याप्रकरणी जमावाविरूद्ध पोलिसांत गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी तिघांना अटक केली असून इतर आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.
घटनेच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी या भागात तणावपूर्ण शांतता होती. रमजानपुरा व आयेशानगर भागातील परिस्थिती पूर्ण नियंत्रणात आहे. शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास खातून डी. एड. कॉलेज परिसरात झालेल्या घटनेसंदर्भात रमजानपुरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश गावीत यांनी रात्री दहा वाजता गुन्हा दाखल केला. दिलशाद अहमद अश्रफअली (१६), जलील अहमद खालीद अख्तर (२५) व अल्ताफ अहमद मुश्ताक अहमद (२४) यांना अटक करण्यात आली. शुक्रवारी बंदोबस्तावरील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना जमावाने दगडफेक करुन जखमी केले. (प्रतिनिधी)
आरोपीला पकडले
आयेशानगर भागातील मदर आयेशा स्कूलमधील ज्युनिअर केजीतील बालिकेवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी शाळेतील सफाई कर्मचारी अजय दणके यास पोलिसांनी अटक केली. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. बुधवारी अत्याचाराची घटना घडली. अत्याचार पीडित बालिकेच्या वडिलांनी शुक्रवारी रात्री फिर्याद दिली.