सुमनगरातील तरुणीच्या हत्येप्रकरणी एकाला अटक

By admin | Published: June 14, 2016 03:09 AM2016-06-14T03:09:45+5:302016-06-14T03:09:45+5:30

कुर्ल्याजवळील सुमननगरात भरदिवसा तरुणीचा खून करून फरारी झालेल्या संशयित तरुणाला अटक करण्यात नेहरुनगर पोलिसांना अखेर २० दिवसांनी यश आले. सलीम नूरमहोम्मद

One arrested for killing a woman in Suman | सुमनगरातील तरुणीच्या हत्येप्रकरणी एकाला अटक

सुमनगरातील तरुणीच्या हत्येप्रकरणी एकाला अटक

Next

मुंबई : कुर्ल्याजवळील सुमननगरात भरदिवसा तरुणीचा खून करून फरारी झालेल्या संशयित तरुणाला अटक करण्यात नेहरुनगर पोलिसांना अखेर २० दिवसांनी यश आले. सलीम नूरमहोम्मद शेख (वय २३) असे त्याचे नाव असून तो रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. तो हल्यानंतर आठ दिवस पसार झाला होता. त्याने लुटमारीसाठी खून केला की एकतर्फी प्रेमातून याचा अद्याप नेमका उलगडा झालेला
नाही.
करिश्मा प्रकाश माने (२४) २४ मे रोजी सकाळी दहाच्या सुमारास ठाणे-मुंबई पूर्व द्रूतगती महामार्गावर कुर्ला स्थानकाजवळून जात असताना अज्ञाताने तिच्या पाठीत सुरा खुपसला होता. उपचारापूर्वी तिचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी घटनास्थळी कसलाही पुरावा न मिळाल्याने संशयिताचा शोध घेणे कठीण बनले होते. परिसरात असलेल्या एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक तरुणी परिसरातून जात असल्याचे दिसत होते, त्यावरून त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने करिश्मा माने जखमी अवस्थेत पडलेली असताना तिच्याजवळून एका तरुणाला पळत जाताना पाहिल्याची कबुली दिली. त्याने सांगितलेल्या वर्णनानुसार सुमनगरातील रेल्वे लाईन परिसरात रहाणाऱ्या सलीम शेख याला अटक करण्यात आली. तो सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर चोरी व लुटमारीचे गुन्हे दाखल आहेत. सलीमने पोलिसांना सुरवातीला तरुणीचा खून आपल्या सुरेश नावाच्या मित्राने केल्याचे सांगून अडकविण्याचा प्रयत्न केला होता, मात्र सखोल चौकशीत तो खोटे बोलत असल्याचे स्पष्ट झाले. करिष्माची पर्स व तिचा मोबाईल नाहीसा झाला आहे. सलीम हा सराईत गुन्हेगार
असल्याने तो पोलिसांना खरी माहिती देत नाही.
मात्र त्याबाबतचे अन्य पुरावे जमविण्यात येत आहे. असे परिमंडळ -६चे उपायुक्त शहाजी उमाप यांनी सांगितले. शेखला १६ जूनला पोलीस कोठडी ठोठावण्यात आली असून
त्याने एकतर्फी प्रेमातून खून
केला की लुटमारीसाठी याचा
उलगडा होईल, असे त्यांनी
सांगितले. (प्रतिनिधी)

साक्षीदाराचा रास्ता रोकोत सहभाग
करिष्माच्या खूनानंतर आठ दिवस उलटूनही आरोपीला पकडता न आल्याने स्थानिक रहिवाशांनी पोलिसांच्या निषेधार्थ रास्ता रोको केला होता. त्यामध्ये सहभागी असलेल्या एका तरुणाचा चेहरा हा हत्येच्या ठिकाणी मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत असलेल्या तरुणाशी मिळता-जुळता असल्याचे पोलीस उपनिरीक्षक सचिन वाघ यांना आढळले.
चौकशी केली असता, भीतीपोटी आपण त्यावेळी तिच्या मदतीसाठी थांबलो नाही, अशी कबुली दिली. त्यावेळी प्रसंगावधान राखून थोडे धाडस दाखविले असते तर कदाचित करिष्मावर उपचार होऊन ती वाचली असती, असे उपायुक्त शहाजी उमाप यांनी सांगितले.

Web Title: One arrested for killing a woman in Suman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.