महाराष्ट्रासाठी अवघा एक प्रशिक्षक

By admin | Published: April 29, 2015 10:01 PM2015-04-29T22:01:45+5:302015-04-30T00:29:07+5:30

योगाची ऐशीतैशी : सर्व खेळांचा पाया मजबूत करण्याबाबत शासन उदासीन

One coach for Maharashtra | महाराष्ट्रासाठी अवघा एक प्रशिक्षक

महाराष्ट्रासाठी अवघा एक प्रशिक्षक

Next

मेहरुन नाकाडे -रत्नागिरी -महाराष्ट्र शासन क्रीडा सेवा संचलनालय, पुणे अंतर्गत विविध खेळांसाठी १२७ प्रशिक्षक कायमस्वरुपी असून मानधनावर ११० प्रशिक्षक आहेत. २००३ मध्ये क्रीडा व योग संचालनालयास प्रारंभ झाला. संपूर्ण राज्यातून एकमेव प्रशिक्षकाची नियुक्ती करण्यात आली. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रशिक्षक पद नेमण्यात आले. परंतु, संपूर्ण राज्याचा विचार करता एकमेव प्रशिक्षक अपुरा ठरत आहे.योग हा सर्व खेळांचा बेस आहे. परंतु त्याकडे खेळाऐवजी व्यायाम प्रकार म्हणूनच पाहिले जाते. शिवाय योग प्रशिक्षण घेतलेल्या प्रशिक्षणार्थींना जिल्हा पुरस्कार किंवा छत्रपती अ‍ॅवॉर्ड, दादाजी कोेंडदेवसारखे पुरस्कार नसल्यामुळे योग स्पर्धेमध्ये शालेय शिक्षण घेत असताना मोजकेच पालक विद्यार्थ्यांना सहभागासाठी परवानगी देतात. वास्तविक योगासनाकडे उतारवयात वळणाऱ्यांची संख्या अधिक आहे. अन्य खेळांसाठी वयोमर्यादा निश्चित असते. मात्र योग स्पर्धेसाठी ८० वर्षापर्यंत सहभाग नोंदवता येऊ शकते. पुणे, मुंबईत योगाकडे करीअर करणारे अधिक आहेत. मात्र आपल्याकडे त्याचा अभाव आहे.सध्या बृहन्महाराष्ट्र योग परीषदेच्या राज्य संघटनेच्या अंतर्गत ३५ जिल्हे संलग्न आहेत. या संघटनेतर्फे योग शिक्षक निर्माण व्हावेत यासाठी प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरु करण्याची नितांत आवश्यकता आहे. सूर्यनमस्कार, आसने इत्यादी मर्यादित योग प्रकार केले जातात. परंतु, विविध योगांचे प्रकार आरोग्यासाठी उपयुक्त आहेत. त्याचे शास्त्रोक्त पद्धतीचे प्रशिक्षण मिळणे आवश्यक आहे. सध्या नवोदय केंद्र विद्यालयात योगा शिक्षकांची नियुक्ती केली जाते. मात्र आपल्याकडच्या शाळांमध्ये याचा अभाव दिसून येत आहे.वयाच्या सहाव्या वर्षापासून योग प्रकार करण्यास मान्यता आहे. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातर्फे १ वर्षाचा पदवीका अभ्यासक्रम सुरु करण्यात आला आहे. योगा प्रकारासाठी पुरस्काराचा अभाव असल्यामुळे स्पर्धात्मक बेस आढळत नाही. त्यामुळे प्रौढ वयात आरोग्याच्या काळजीसाठी योग प्रकार केला जातो. मात्र लहानपणी योग करण्याकडे पालकवर्ग मज्जाव करतात. काही ठराविक पालकच मुलांना योग प्रशिक्षणासाठी पाठवत असल्याचे दिसून येते.
योग स्पर्धेसाठी केवळ शालेय स्पर्धांना सवलती दिल्या जातात. मात्र इतर फेडरेशन, खुल्या, असोसिएशनच्या स्पर्धांना पालकांना खर्च करावा लागतो. प्रत्येक संस्थांनी योग प्रकाराचा स्वतंत्र अभ्यासक्रम नियुक्त केला आहे. मात्र शासनाने जर ठोस भूमिका घेऊन योगप्रकारास खेळ म्हणून मान्यता दिली पाहिजे. तरच एक निश्चित अभ्यासक्रमास मान्यता मिळेल.
कैवल्यधाम योगा रिसर्च सेंटर, लोणावळा, योग विद्याधाम नाशिक व स्वामी विवेकानंद केंद्र, बेंगलोर या ठिकाणी योग प्रशिक्षण दिले जाते. हरीयाणा, पंजाबसारख्या राज्यातून ७० ते ८० योग प्रशिक्षकांची निवड केली जाते. परंतु, महाराष्ट्रामधून केवळ एकमेव प्रशिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यस्तरीय असो वा राष्ट्रीय स्पर्धेकडे जाणाऱ्या स्पर्धकांना राज्य प्रशिक्षकांचे मार्गदर्शन अपेक्षित असते. एकमेव प्रशिक्षकांमुळे सर्व स्पर्धकांना पाहिजे तितका वेळ मिळू शकत नाही. केवळ एक प्रशिक्षकच राज्य संभाळत असल्याने योगाचे तीनतेरा वाजले आहेत. राष्ट्रीय शालेय योगासन स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना शासनाकडून येणे-जाणे बरोबर खाण्याचा खर्च तसेच गणवेश व शिष्यवृत्ती दिली जाते. विजेत्या प्रथम स्पर्धकास रोख ११ हजार रुपये, सुवर्णपदक, द्वितीय विजेत्या स्पर्धकास रौप्यपदक व ८ हजार ९०० रुपये, तृतीय स्पर्धकास कांस्यपदक व ६,७५० रुपये तर सहभागी स्पर्धकांना ३,७५० रुपये दिले जातात. शिवाय ५ टक्के आरक्षण देण्यात येते. योग प्रकारात खेळ म्हणून मान्यता मिळाली तर या स्पर्धेकडे वळण्याचा कल वाढेल, शिवाय भावी पिढीदेखील तंदुरुस्त राहिल, यात शंका नाही.


क्रीडा सेवा संचलनालय पुणे अंतर्गत विविध खेळांसाठी १२७ प्रशिक्षक कायमस्वरुपी.
मानधनावर ११० प्रशिक्षक.
२००३ मध्ये क्रीडा व योग संचालनालयास प्रारंभ.
हरियाणा, पंजाबसारख्या राज्यातून ७० ते ८० योग प्रशिक्षकांची निवड.
महाराष्ट्रामधून केवळ एकमेव प्रशिक्षकांची नियुक्ती.

Web Title: One coach for Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.