इमारतीचा स्लॅब कोसळून एकाचा मृत्यू

By admin | Published: November 5, 2016 04:43 AM2016-11-05T04:43:12+5:302016-11-05T04:43:12+5:30

येथील कॅम्प नंबर ३ परिसरातील सपना गार्डनजवळ असलेल्या सिंधरी अर्पाटमेंट या चार मजली इमारतीच्या चौथ्या मजल्यावरचा स्लॅब कोसळून एकाचा मृत्यू झाला

One collapses slab collapse | इमारतीचा स्लॅब कोसळून एकाचा मृत्यू

इमारतीचा स्लॅब कोसळून एकाचा मृत्यू

Next


उल्हासनगर : येथील कॅम्प नंबर ३ परिसरातील सपना गार्डनजवळ असलेल्या सिंधरी अर्पाटमेंट या चार मजली इमारतीच्या चौथ्या मजल्यावरचा स्लॅब कोसळून एकाचा मृत्यू झाला. मनोहर कामरिया (५२) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या घटनेतून मनोहर यांची पत्नी व मुलगा बचावले. हे दोघे किरकोळ जखमी झाले. ही घटना शुक्रवारी सायंकाळी साडेसहा वाजता घडली. या घटनेनंतर उल्हासनगर महापालिकेने इमारत रिकामी करून सील ठोकले. शनिवारी या इमारतीचे स्ट्रक्चरल आॅडिट होईल.
१९९२मध्ये बिल्डर हरदास थारवानी यांनी सिंधरी ही इमारत बांधल्याची माहिती पुढे आली आहे. या इमारतीत सगळे व्यापारी राहतात. इमारतीतील सगळे फ्लॅट थ्री आणि फोर बीएचके आहेत. या इमारतीत १२ सदनिका आहेत. या इमारतीचे दुरुस्तीचे काम काही दिवसांपूर्वी हाती घेण्यात आले होेते. त्यामुळे काही रहिवासी दुसरीकडे राहण्यासाठी गेले होते. तर काहींनी तेथेच राहणे पसतं केले. शुक्रवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास चौथ्या मजल्यावरील स्लॅब कोसळला. स्लॅबचा काही भाग पहिल्या मजल्यावर आला. पहिल्या मजल्यावरील गॅलरीत मनोहर बसले होते. स्लॅबचा कोसळलेला भाग त्यांच्या डोक्यात पडला. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. यावेळी घरात त्यांची पत्नी कविता आणि मुलगा विनोद होते. हे दोघे किरकोळ जखमी झाले. त्यांना बाहेर काढण्यात आले.
यापूर्वीही उल्हासनगरमध्ये धोकादायक इमारती पडण्याच्या घटना घडलेल्या असल्याने सिंधरी इमारत पडल्याची बातमी उल्हासनगरमध्ये वाऱ्यासारखी पसरली. ही बातमी कळताच अग्निशमन दल, पोलिस व महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्वरित धाव घेतली. या इमारतीपर्यंत पोहचण्यासाठी वाहतूक कोंडीचा अडथळा निर्माण झाला होता. दुरुस्ती सुरु असताना ही घटना घडल्याने महापालिका अधिकाऱ्यांनी राहत असलेल्या सगळ््यांना इमारतीबाहेर काढून इमारत रिकामी केली आहे. या इमारतीचे उद्यापासून स्ट्रक्चरल आॅडिट केले जाणार आहे.(प्रतिनिधी)
>इमारत धोकादायक नव्हती - पालिका
ही इमारत धोकादायक नसल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. दुरुस्तीचे काम कोणत्या कंत्राटदाराला दिले होते. त्याने सुरक्षिततेची पुरेशी काळजी घेतली होती की नाही? कामरिया यांच्या मृत्यूस कोण जबाबदार आहे? याचा सगळा उलगडा पोलीस तपासातून होईल.

Web Title: One collapses slab collapse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.