म्हाडा कर्मचारी देणार एक दिवसाचा पगार
By Admin | Published: November 7, 2015 03:03 AM2015-11-07T03:03:53+5:302015-11-07T03:03:53+5:30
राज्यात पावसाने पाठ फिरवल्याने यंदा अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व स्तरातून मदतीचा
मुंबई : राज्यात पावसाने पाठ फिरवल्याने यंदा अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व स्तरातून मदतीचा ओघ सुरू असतानाच म्हाडातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी
आपला एक दिवसाचा पगार दुष्काळग्रस्तांना देण्याचा निर्णय घेतला आहे.
म्हाडातील काही कर्मचाऱ्यांनी दिवाळीनिमित्त मिळालेल्या सानुग्रह अनुदानाची रक्कम दुष्काळग्रस्तांसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे.
म्हाडातील सुमारे दोन हजार
कर्मचारी आपला एक दिवसाचा
पगार दुष्काळग्रस्तांना देतील.
आपला एक दिवसाचा पगार देण्याबाबत कोणावरही बंधन घालण्यात आले नसल्याचेही
कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्याने सांगितले. (प्रतिनिधी)