आत्महत्या केलेल्या शेतक-यांच्या परिवारासाठी एक मूठ धान्य

By admin | Published: December 31, 2015 02:38 AM2015-12-31T02:38:58+5:302015-12-31T02:38:58+5:30

वाशिमची राजरत्न संस्था व नेहरु मंडळाचा उपक्रम.

One hand grain for the family of suicides | आत्महत्या केलेल्या शेतक-यांच्या परिवारासाठी एक मूठ धान्य

आत्महत्या केलेल्या शेतक-यांच्या परिवारासाठी एक मूठ धान्य

Next

नंदकिशोर नारे/वाशिम: सततची नापिकी, अवकाळी पाऊस आणि वाढत्या महागाईमुळे बळीराजा हवालदिल झाला असून, शेतकरी आत्महत्यांमुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. ही बाब हेरुन वाशिमची राजरत्न संस्था व नेहरु मंडळाने सोशल मीडियाच्या मदतीने ह्यएक मूठ धान्य आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांच्या परिवारासाठीह्ण उपक्रम सुरु केला आहे. या उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळत आहे.
जगाचा पोशिंदा व लोक जीवनाचा आधारस्तंभ म्हणून शेतकर्‍यांकडे पाहिले जाते; मात्र प्राप्त परिस्थितीत बळीराजावर आत्महत्येची पाळी आली आहे. राज्याचा विचार केल्यास सर्वात जास्त आत्महत्या विदर्भात होत आहेत. अशा स्थितीत शेतकरी आत्महत्याग्रस्त निराधार परिवारांना मायेची साथ मिळावी, याकरिता सामाजिक कार्यात अग्रेसर असलेली वाशिम येथील राजरत्न अल्पसंख्याक शिक्षण प्रसारक व बहुउद्देशीय संस्था आणि एकांबा येथील नेहरू युवा बहुउद्देशीय मंडळाच्या सहयोगाने ह्यएक मूठ धान्य आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांच्या परिवारासाठीह्ण जमा करून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयास देण्याचे ठरविले आहे. यासाठी सोशल मिडीयासह पथनाट्य, तसेच मार्गदर्शन शिबिराद्वारे शाळा-महाविद्यालयांमध्ये जनजागृती केली जात आहे. १0 डिसेंबरपासून सुरू केलेल्या या उपक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. नवीन वर्षातील पहिल्या रविवारपासून एका गावाची निवड करून, त्या गावातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयास हे धान्य वितरित केले जाणार आहे. या उपक्रमासाठी संस्थेचे युवा मित्र विनोद पट्टेबहादूर, युवा मित्र भगवान ढोले, अरविंद उचित, युवा मित्र आकाश खडसे, जिल्हा युवती मित्र सोनल तायडे, स्नेहल तायडे, अभिनेत्री हंसीनी उचित, विजय चव्हाण, राम पाटील, विकास अवगण, पवन राऊत, गजानन गोटे, विजय सावळकर, पवन खुनारे आणि नितीन आढाव परिङ्म्रम घेत आहेत.

दर रविवारी राबविणार उपक्रम
संस्थेने सुरु केलेल्या उपक्रमातून जमा झालेल्या धान्याचे वितरण नवीन वर्षातील पहिल्या रविवारपासून केल्या जाणार आहे. एका गावातील जवळपास पाच आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांचा समावेश राहील. गरज पाहून धान्याचे वितरण करण्याचा संस्थेचा मानस आहे.

वासुदेवाच्या वेशभूषेत अभिनेता उचित करतोय प्रचार
या उपक्रमाला प्रतिसाद मिळावा याकरिता संस्थेच्यावतिने विविध युक्त्या लढविण्यात येत आहे. मराठी चित्रपटातील अभिनेते अरविंद उचित वासुदेवाच्या वेशभूषेत गावागावात जावून याबाबत जनजागृती करीत आहेत.

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला दिली जाणार धान्याची ह्यकीटह्ण
दर रविवारी एका गावाची निवड करुन आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला एक धान्याची कीट देण्यात येणार आहे. यामध्ये १0 किलो धान्य (गहू किंवा ज्वारी), १0 किलो तांदूळ, २ किलो दाळ (उपलब्ध असलेली), २ लिटर खाद्य तेल व एक मसाला पाकीट ज्यामध्ये मिरची, मीठ व इतर स्वयंपाकासाठी लागणार्‍या पदार्थांचा समावेश आहे.

Web Title: One hand grain for the family of suicides

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.