एका एकरातून वर्षभरात कमावले साडेनऊ लाख
By अोंकार करंबेळकर | Published: September 15, 2017 12:47 AM2017-09-15T00:47:29+5:302017-09-15T00:47:59+5:30
शेतीत काहीच राहिलं नाही, अशी ओरड करणा-या सा-यांसाठी जुन्नर तालुक्यातल्या रोहोकडी गावच्या एका तरुणाने एक नवा आदर्श निर्माण केला असून, आपल्या जिद्दीच्या जोरावर केवळ एका एकरातून वर्षभरात त्याने साडेनऊ लाख रुपये कमावले आहेत.
ओतूर (जुन्नर, पुणे) : शेतीत काहीच राहिलं नाही, अशी ओरड करणा-या सा-यांसाठी जुन्नर तालुक्यातल्या रोहोकडी गावच्या एका तरुणाने एक नवा आदर्श निर्माण केला असून, आपल्या जिद्दीच्या जोरावर केवळ एका एकरातून वर्षभरात त्याने साडेनऊ लाख रुपये कमावले आहेत.
वैभव मुराद्रे हा तो तरुण शेतकरी. स्वत: इंजिनीअर पण त्याने शेतीच करायची ठरवली. ओतूर येथे झालेल्या किसान महाचर्चेमध्ये त्याने आपली यशोगाथा ऐकवली तेव्हा सर्व शेतकरी थक्क झाले. या चर्चेमध्ये यूपीएल कंपनीचे झेबा उत्पादन वापरणाºया जुन्नर, पुरंदर अशा अनेक तालुक्यांतील शेतकºयांनी अनुभवांचे कथन केले. झेबामुळे डाळिंब, टोमॅटोचे विक्रमी उत्पादन घेता आले, असे त्यांनी सांगितले.
वैभव म्हणतो, अभियांत्रिकीनंतर १०-१५ हजारांच्या नोकरीचा पर्याय होताच; पण दुसरीकडे घरची ४ एकर शेतीही होती. त्यामुळे शेतीतच कष्ट करून दाखवायचा निर्णय घेतला. पहिली एकदोन वर्षे योग्य हमीभाव न मिळाल्याने तोटाही झाला; पण प्रयत्न सोडले नाहीत. या वर्षी त्याने एक एकर क्षेत्रात टोमॅटोची लागवड केली. त्यासाठी यूपीएलचे झेबा तंत्रज्ञान वापरले. मक्याच्या स्टार्चपासून केलेल्या झेबामुळे टोमॅटोच्या मुळांना योग्य प्रमाणात व सतत अन्नद्रव्ये आणि पाण्याचा पुरवठा होत राहिला, पर्यायाने उत्पन्नही भरपूर मिळाले. घरच्या सर्व लोकांनी मनापासून कष्ट केले तर शेतीसारखा व्यवसाय नाही, असे वैभवचे मत आहे. एक एकर शेतीसाठी त्याला दीड लाख खर्च आला तर उत्पन्न साडेनऊ लाख रुपयांचे मिळाले. टोमॅटोबरोबर कांदा, कॉलीफ्लॉवर अशी पिकेही तो घेतो.
झेबामुळे पांढºया मुळांची वाढ चांगली झाली आणि रोपेही कमी प्रमाणात मेली, असेही तो म्हणतो.
झेबामुळे शेती उत्पादनात क्रांती
झेबा हे मक्याच्या स्टार्चपासून तयार केलेले उत्पादन आहे. आपल्या वजनाच्या चारशे पट पाणी धरून ठेवणे हे त्याचं वैशिष्ट्य आहे. शोषलेले पाणी योग्य वेळेस सतत मुळांना देत राहणं हे झेबाचं मुख्य काम आहे. मुळांभोवती पाणी व पोषकद्रव्ये साठवल्यामुळे पिकांना मोठा फायदा होतो. वाहून जाणारी पोषकद्रव्ये रोखल्यामुळे रोपांची वाढ चांगली होते. जमिनीत हवा खेळती राहून पोतही सुधारतो. कांदा, डाळिंब, फ्लॉवर, टोमॅटो अशा पिकांसाठी झेबा वापरलं आहे. त्यामुळे पिके चटकन व सशक्त उभारी घेत असल्याचं दिसून आलं आहे. - समीर टंडन, क्षेत्रीय संचालक, यूपीएल