पिंपरीतून शंभर याचिका

By admin | Published: February 28, 2017 01:54 AM2017-02-28T01:54:50+5:302017-02-28T01:54:50+5:30

मतदान यंत्रांमध्ये (ईव्हीएम) घोटाळा झाल्याचा आरोप पुणे महापालिकेपाठोपाठ पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सर्वपक्षीय पराभूत उमेदवारांनी केला

One hundred petitions from Pimpri | पिंपरीतून शंभर याचिका

पिंपरीतून शंभर याचिका

Next


पिंपरी : महापालिका निवडणुकीसाठीच्या मतदान यंत्रांमध्ये (ईव्हीएम) घोटाळा झाल्याचा आरोप पुणे महापालिकेपाठोपाठ पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सर्वपक्षीय पराभूत उमेदवारांनी केला आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णय भाजपा वगळता सर्वपक्षीय उमेदवार आणि नेत्यांनी घेतला. किमान १०० याचिका न्यायालयात दाखल करून मोर्चाही काढण्यात येणार आहे.
पिंपरी येथील नारायण मेघाजी लोखंडे भवनात आज दुपारी साडेबाराला सर्वपक्षीय नेत्यांची सभा झाली. या वेळी महापौर शकुंतला धराडे, माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे, माजी महापौर योगेश बहल, सत्तारुढ पक्षनेत्या मंगला कदम, नाना काटे, माजी स्थायी समिती सभापती प्रशांत शितोळे, विलास नांदगुडे, फजल शेख, शिवसेनेचे मारुती भापकर, भगवान वाल्हेकर उपस्थित होते.
भाजपाने ईव्हीएम मशिनमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप पराभूत उमेदवारांनी केला. या वेळी कोळसे-पाटील यांनी ईव्हीएम मशिनमध्ये घोटाळा होऊ शकतो,हे सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच मान्य केल्याचे उपस्थितांना सांगितले. कोळसे पाटील म्हणाले, ‘‘जगातील बहुतांश ठिकाणी ईव्हीएम मशिनद्वारे निवडणुका घेतल्या जात नाहीत. सर्वोच्च न्यायालयाने सांगूनही निवडणूक आयोगाने मशिन बदलल्या नाहीत. याबाबत आयोगाकडे विचारणा केली असता सरकार पैसे देत नसल्याचे सांगितले. याचिका दाखल करताना ईव्हीएम मशिनमध्ये घोटाळा झाल्याचा सबळ पुरावा असला पाहिजे. तो पाहून न्यायालय दखल घेईल. निवडणूक अधिकारी, निवडणूक आयुक्त, महापालिका आयुक्त आणि राज्य निवडणूक आयुक्त यांच्याकडे तक्रार द्यावी. भविष्यात बॅलेटचा वापर करावा. त्यानुसार निवडणूक घेण्याची मागणी करावी. न्यायालयाच्या आदेशाचा निवडणूक आयोगाने अवमान केला आहे.’’(प्रतिनिधी)
>संजोग वाघेरे : ही तर जनता आणि लोकशाहीची फसवणूक आहे.
मारुती भापकर : सत्तेच्या गैरवापराने लोकशाही कमकुवतचा प्रयत्न
सचिन साठे : भाजपाकडून नाही, तर ईव्हीएम मशिनकडून पराभव
प्रशांत शितोळे : भाजपाने बॅलेट पेपरद्वारे निवडून येऊन दाखवावे.

Web Title: One hundred petitions from Pimpri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.