सांगलीत मगरीच्या हल्ल्यात एकजण जखमी

By admin | Published: August 17, 2015 12:50 AM2015-08-17T00:50:06+5:302015-08-17T00:50:06+5:30

मगरीने केलेल्या हल्ल्यात कसबे डिग्रज (ता. मिरज) येथे एक जण गंभीर जखमी झाला. कृष्णा नदी पाणवठ्यावर रविवारी सकाळी सात वाजता ही थरारक

One injured in Congolith crocodile attack | सांगलीत मगरीच्या हल्ल्यात एकजण जखमी

सांगलीत मगरीच्या हल्ल्यात एकजण जखमी

Next

कसबे डिग्रज (सांगली) : मगरीने केलेल्या हल्ल्यात कसबे डिग्रज (ता. मिरज) येथे एक जण गंभीर जखमी झाला. कृष्णा नदी पाणवठ्यावर रविवारी सकाळी सात वाजता ही थरारक घटना घडली. याठिकाणी पोहायला आलेल्या युवकांनी प्रतिकार करून मगरीच्या तावडीत सापडलेल्या या व्यक्तीची सुटका केली.
उमराव घाटगे (४६) हे मुलासोबत नदीत पोहायला गेले होते. पोहून झाल्यावर मुलास नदीकाठी पाठविले आणि ते नदीतच गुडघाभर पाण्यात उभे होते. त्यावेळी मगरीने त्यांचा डावा पाय पकडला. घाटगे यांनी आरडाओरड केल्यानंतर मोहन कदम, अभिजित लवटे, दीपक गिड्डे, विश्वास माळी, शशिकांत करंटे या युवकांनी यांनी घाटगे यांना पकडून धरले. त्यामुळे मगरीला घाटगे यांना पाण्यात ओढून देता आले नाही. तरी इतरांनी दगड मारल्यामुळे मगरीने घाटगे यांना सोडून पाण्यात पलायन केले.
या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या उमराव घाटगे यांच्या पायावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. दोन तास शस्त्रक्रिया सुरु होती. यामध्ये त्यांना ५२ टाके घातले आहेत. वन अधिकाऱ्यांनी घाटगे यांचा जबाब घेतला असून त्यांना तातडीची मदत म्हणून पाच हजार रुपये देण्यात आले आहेत. दरम्यान या घटनेने कृष्णाकाठच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Web Title: One injured in Congolith crocodile attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.