ठाकुर्लीमध्ये भोईर टोळीच्या गुंडांकडून एकाचे अपहरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2017 02:52 AM2017-05-11T02:52:37+5:302017-05-11T02:52:37+5:30
इंटिरिअरचे काम करण्याच्या वादातून मंगळवारी हत्या करण्यात आलेल्या किशोर चौधरी यांच्या कार्यालयात त्या वेळी हजर असलेला
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : इंटिरिअरचे काम करण्याच्या वादातून मंगळवारी हत्या करण्यात आलेल्या किशोर चौधरी यांच्या कार्यालयात त्या वेळी हजर असलेला महिमादास विल्सन (१९) हा तरु ण त्याच गोळीबारात जखमी झाला असून त्या घटनेनंतर तो बेपत्ता असल्याची तक्रार त्याची शोकमग्न आई अॅन्थोनी अम्मा यांनी दाखल केली आहे.
महिमादासची आई अॅन्थोनी अम्मा यांनी पत्रकारांना सांगितले की, मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता माझा मुलगा महिमादास हा किशोर चौधरी यांच्याकडे गेला होता. तेव्हापासून तो बेपत्ता आहे. त्याचा मोबाइल फोन बंद आहे. या वेळी महिमादाससोबत असलेल्या त्याचा साथीदाराने दिलेल्या माहितीनुसार, महिमादास व त्याला भोईर टोळीच्या गुंडांनी बेदम मारहाण केल्याने त्याचा पाय फ्रॅक्चर झाला. गोळीबारात महिमादासच्या खांद्याला गोळी लागली असून त्याला आरोपींनीच आपल्यासोबत गाडीतून नेल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. चौधरी यांच्या कार्यालयात हजर असलेल्या प्रमोद नावाच्या व्यक्तीलाही भोईर टोळीचे गुंड उचलून नेत होते. मात्र, त्याला सोडून देण्यात आले. परंतु, जखमी महिमादासला ते सोबत घेऊन गेले, असा संशय आहे. यापूर्वी महिमादासचा लहान भाऊ सायकल चालवत बालाजीनगर परिसरात गेला असता भोईरच्या गुंडांनी त्याला मारहाण केली होती. भोईर या गुंडाच्या दादागिरीविरोधात रामनगर पोलीस ठाण्यासह पोलीस आयुक्तांकडे वारंवार तक्र ारी केल्याचे नगरसेविका खुशबू चौधरी यांनी सांगितले.