बसच्या अपघातात १ ठार ४0 जखमी

By admin | Published: October 4, 2016 01:58 AM2016-10-04T01:58:54+5:302016-10-04T01:58:54+5:30

मोताळा व नांदुरा तालुक्यात घडले दोन अपघात; सेवानवृत्त मुख्याधापकाचा अपघाती मृत्यू.

One killed, 40 injured in bus accident | बसच्या अपघातात १ ठार ४0 जखमी

बसच्या अपघातात १ ठार ४0 जखमी

Next

बुलडाणा, दि. ३- मोताळा व नांदुरा येथे घडलेल्या एस. टी. बसच्या दोन अपघातात १ जण ठार तर ४0 जण जखमी झाले.
नांदुरा तालुक्यात एसटी बसचे स्टेअरींगवरील संतुलन बिघडल्यामुळे बस उलटून झालेल्या अपघातात ४0 प्रवासी जखमी झाले. ही घटना सोमवारी ११.३0 चे दरम्यान नांदुरा शहरापासून ८ कि.मी. अंतरावर घडली. मलकापूर आगाराची जिगाव-नांदुरा (क्र.एमएच ४0-एन ८२२९) ही बस जिगाव येथून ११ वाजता प्रवासी घेऊन निघाली होती. बस राष्ट्रीय महामार्गावर येताच नांदुरानजीक बसचे स्टेअरींग फ्री झाल्याने चालक पी.एम. कोलते यांचे बसवरील नियंत्रण सुटले व बस रस्त्याच्या खाली जावून गड्डय़ा त पलटी झाली. नांदुर्‍याचा सोमवारी आठवडी बाजारचा दिवस असल्याने बसमध्ये यावेळी ५८ ते ६0 प्रवासी होते. या अपघातात ४0 प्रवासी जखमी झाले. जखमींपैकी ३१ जणांवर नांदुरा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. तर उर्वरित जखमींनी आपल्या सोयीप्रमाणे खासगी दवाखान्यात उपचार केले. प्राथमिक आरोग्य केंद्रात उ पचार केल्यानंतर काही जखमींना खामगाव येथे हलविण्यात आले.
दुसर्‍या घटनेत बसखाली आल्याने सेवानवृत्त मुख्याध्यापक ठार झाले. ही घटना मोताळा बस स्थानकावर घडली. राज्य परिवहन महामंडळाच्या धडकेने मागच्या चाकात येऊन कोथळी येथील सेवानवृत्त मुख्याध्यापक मनोहर ओंकारदास राठी (वय ७२) हे जबर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. ही घटना मोताळा बस स्थानकावर ३ ऑक्टोबर रोजी दुपारी १ : ३0 वाजताच्या सुमारास घडली. पोलीस सूत्रांनुसार कोथळी येथील मनोहर ओंकारदास राठी हे सोमवारी दीड वाजेच्या सुमारास बुलडाणा येथून मोताळा बसस्थानकावर उतरून घराकडे जात होते. दरम्यान, माहुरगडहून जळगाव खांदेशकडे जाणारी बस क्र. एम.एच.२0 बी.एल.३४४७ च्या चालकाने भरधाव व निष्काळजीपणे चालवून मनोहर राठी यांना पाठीमागून जबर धडक दिली. या धडकेत मनोहर राठी गंभीर जखमी झाले. त्यांना ता तडीने येथील डॉ. महाजन यांच्या दवाखान्यात नेण्यात आले; मात्र प्रकृती गंभीर असल्याने बुलडाणा येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले; मात्र वाटेतच त्यांचा दुर्दैवी मृत्यू ंझाला. मनोहर राठी हे कोथळी येथील जनता हायस्कूलमध्ये मुख्याध्यापक होते. त्यांच्या पश्‍चात पत्नी, तीन मुले व आप्त परिवार आहे. याप्रकरणी गणेशकुमार राठी यांच्या तक्रारीवरून बस चालकाविरुद्ध कलम २७९, ३३७, ३३८, ३0४ अ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: One killed, 40 injured in bus accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.