गृहराज्यमंत्री राम शिंदेच्या ताफ्यातील गाडीच्या अपघातात एकाचा मृत्यू, 8 जखमी
By admin | Published: May 7, 2016 06:59 PM2016-05-07T18:59:36+5:302016-05-07T19:46:16+5:30
गृहराज्यमंत्री राम शिंदे यांच्या ताफ्यातील गाडीचा अपघात झाला आहे, एकाचा मृत्यू झाला असून 8 जण जखमी झाले आहेत
Next
>ऑनलाइन लोकमत -
अहमदनगर, दि. 07 - गृहराज्यमंत्री राम शिंदे यांच्या ताफ्यातील पोलीस वाहनाची आणि एका भरधाव मारुती अल्टो कारची धडक होऊन कारमधील एकजण जागीच ठार झाला, तर आठजण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये चार पोलिसांचा समावेश आहे.
शिंदे हे शनिवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास श्रीरामपूरहून नेवासा येथे कार्यक्रमासाठी जात होते. श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभाननजिक त्यांच्या वाहनांचा ताफा आला असता समोरुन भरधाव वेगाने आलेल्या कारने अगोदर शिंदे यांच्या वाहनाला हूल दिली. त्यानंतर ताफ्यातील दुस-याही वाहनाला हूल देऊन ही कार तिस-या क्रमांकावरील पोलिसांच्या वाहनाला धडकली़.
कारमधील अशोक धावडे (वय 40, रा़ अशोकनगर, श्रीरामपूर) हे जागीच ठार झाले, तर गौरव अशोक धावडे व अशोक भास्कर साळवे हे दोघे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर श्रीरामपूर येथील साखर कामगार रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कारचालक भूषण भाटिया, गणोश परदेशी यांच्यासह अजय सुखदेव खोमणो, भास्कर मारुती तावरे, बजरंग ओगले (पोलीस गाडीचा चालक), उमेश भानुदास इंगवले हे पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.