मुंबई-गोवा मार्गावर अपघातात एक ठार

By admin | Published: February 1, 2016 03:03 AM2016-02-01T03:03:29+5:302016-02-01T03:03:29+5:30

मुंबई-गोवा महामार्गावर खारपाडा ब्रीजवर रविवारी पहाटे ४.३० च्या सुमारास पिकअप व्हॅनला टँकरची धडक बसून एक जण ठार झाला, तर चौघे गंभीर जखमी झाले.

One killed in accident on Mumbai-Goa road | मुंबई-गोवा मार्गावर अपघातात एक ठार

मुंबई-गोवा मार्गावर अपघातात एक ठार

Next

पेण : मुंबई-गोवा महामार्गावर खारपाडा ब्रीजवर रविवारी पहाटे ४.३० च्या सुमारास पिकअप व्हॅनला टँकरची धडक बसून एक जण ठार झाला, तर चौघे गंभीर जखमी झाले. पेण पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद झाली असून जखमींवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुुरू आहेत.
या भीषण अपघातात टँकर पुलावरच पलटी झाला. पिकअप व्हॅनमधील प्रकाश सोनू सोलकर (रा. खेतवाडी, मुंबई) याचा मृत्यू झाला तर चंद्रकांत पाटील (४६, रा. खेतवाडी), महेश धनराज मोडे (२३, रा. नेरूळ), कोमल जयंत येले (२४), हंस जयंत येले (४, रा. विरार) गंभीर जखमी झाले.
पुलाच्या मध्यभागीच अपघात झाल्यामुळे दोन्ही बाजूंकडील वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे महामार्गावरची वाहतूक पेण - खोपोली मार्गावरून वळविण्यात आली.
सुटीचा दिवस असल्याने कोकणात जाणाऱ्यांची व पर्यटकांची गर्दी मोठ्या प्रमाणात होती. त्यामुळे कोंडीत भर पडली. अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या साहाय्याने पुलाच्या कडेला आणून ठेवल्यानंतर वाहतूक सुरू झाली. तब्बल १० तासांनी दुपारी २.०० वाजता वाहतूककोंडी दूर करण्यात पोलिसांना यश आले. (वार्ताहर)ोपोली : कार्ला येथील एकवीरा देवीचे दर्शन घेऊन परत येत असलेल्या भक्तांचा टेम्पो खंडाळा घाटात पलटी झाला. अपघातात नऊ जण जखमी झाले. हा अपघात रविवारी संध्याकाळी ४.३० च्या सुमारास घडला. एकाची प्रकृती गंभीर आहे. हे सर्वजण डोंबिवली व परिसरातील आहेत.
त्यांच्या टेम्पोचे ब्रेक खंडाळा घाटात अवघड वळणावर निकामी झाल्याने टेम्पो पलटी झाला. निखील म्हात्रे (१४), बाळू म्हारसे (३७), सोमनाथ म्हात्रे (३५), अक्षय पालेकर (१५), करण भोईर (१५), आदर्श बागडे (१७), समीर म्हात्रे (३६), दत्ता म्हात्रे (४४), सुरेश शेळके (३२) जखमी झाले. त्यांना डोंबिवलीला हलविण्यात आले आहे. निखील म्हात्रेच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे.

Web Title: One killed in accident on Mumbai-Goa road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.