चिखलीतील गॅस स्फोटात एक ठार, दोन जखमी

By admin | Published: November 13, 2016 09:02 PM2016-11-13T21:02:15+5:302016-11-13T21:01:39+5:30

घरगुती वापराच्या छोटया आकारातील गॅससिलिंडरचा स्फोट होऊन चिखली गावठाण येथे एकाचा होरपळून मृत्यू झाला.

One killed and two injured in a gas explosion in Chikhlii | चिखलीतील गॅस स्फोटात एक ठार, दोन जखमी

चिखलीतील गॅस स्फोटात एक ठार, दोन जखमी

Next

ऑनलाइन लोकमत

पिंपरी-चिंचवड, दि. 13 - घरगुती वापराच्या छोटया आकारातील गॅससिलिंडरचा स्फोट होऊन चिखली गावठाण येथे एकाचा होरपळून मृत्यू झाला. तर दोन जण गंभीर जखमी झाले. ही घटना रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास घडली. संत तुकारामनगरच्या अग्निशामक दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. भगवान दत्तात्रय इंगळे असे मृत्यूमुखी पडलेल्याचे नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चिखलीत भांड्यांच्या दुकानाच्या गोदामात गॅस सिलेंडरचा साठा आहे. तसेच त्या ठिकाणी घरगुती गॅस भरून देण्याचे काम केले जात होते. त्यावेळी छोट्या आकारातील पाच किलो वजनाच्या छोट्या आकारातील गॅसच्या टाकीचा स्फोट झाला. या स्फोटात ज्या ठिकाणी गॅस सिलेंडर ठेवले होते, ते शेड उद्धवस्त झाले, शेजारी असलेल्या मिठाई विक्रीच्या दुकानाला आग लागली. त्यावेळी तेथे असलेले भगवान दत्तात्रय हिंगे (वय ४२,रा. चिंचवड) हे गॅस स्फोटात गंभीर जखमी झाले. तर मिठाईच्या दुकानाजवळ थांबलेले दोन जण जखमी झाले. त्यातील एकाचे नाव संतोष साने असे आहे. अन्य एका जखमीचे नाव समजू शकले नाही. 

घटनेची माहिती मिळताच अग्निशामक विभागाचे अधिकारी किरण गावडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशामक दलाच्या जवानांनी परिसरातील गॅस टाक्या तातडीने अन्यत्र नेल्या. मिठाईच्या दुकानांवर पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. जखमींना तातडीने उपचारासाठी रूग्णालयात हलविण्यात आले आहे. मृत्यूमुखी पडलेले इंगळे हे महापालिकेचे कर्मचारी असल्याचे समजते. 

Web Title: One killed and two injured in a gas explosion in Chikhlii

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.