वीज पडून एक ठार; १७ जनावरे दगावली
By admin | Published: June 6, 2016 02:22 AM2016-06-06T02:22:29+5:302016-06-06T02:22:29+5:30
खामगाव, नांदुरा, शेगाव परिसरात वादळी वा-यासह पाऊस;घरांची पडझड, केळी पिकाचे नुकसान.
खामगाव : खामगाव, नांदुरा, शेगाव परिसरामध्ये रविवारी वादळी वार्यासह पाऊस झाला. गारडगाव येथील युवा शेतकरी ज्ञानेश्वर सुपडाजी वाडेकर यांचा वीज पडल्याने मृत्यू झाला. या घटनेत शेतकर्याचा एक बैलही ठार झाला आहे. दुसर्या घटनेत विहीगाव शिवारात वीज पडल्यामुळे बकर्यांसह १५ जनावरे दगावली. गोंधनापूर येथील शेतकरी रामकृष्ण सदाशिव खंडारे यांचा एक बैल वीज पडून जागीच ठार झाला आहे. वर्णा येथे दुपारी वादळी वार्यासह झालेल्या पावसामुळे शेती पिकासह मालमत्तेचीही मोठी हानी झाली. विजेच्या तारा तुटल्याने वीजपुरवठाही खंडित झाला आहे. तालुक्यातील गारडगाव येथील ज्ञानेश्वर सुपडाजी वाडेकर (२७) हे शेतातून जनावरे घेऊन जात असताना दुपारी २ वाजताचे सुमारास वादळी वारा व विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला. यामध्ये घरी रस्त्याने येत असताना ज्ञानेश्वर वाडेकर यांच्या अंगावर वीज पडल्याने ते जागीच ठार झाले, तर त्यांच्या शेजारी असलेला एक बैलही ठार झाला आहे. घटनेची माहिती मिळ ताच गावकर्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतक ज्ञानेश्वर वाडेकर यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ व पत्नी आहे. मागील दोन वर्षांंपूर्वीच ज्ञानेश्वरचे लग्न झाले होते. त्यांच्या अकाली निधनाने गावामध्ये हळहळ व्यक्त होत आहे. गोंधनापूर येथे बैल ठार वादळी वारा व विजांसह पाऊस झाला असताना तालुक्यातील गोंधनापूर येथील शेतकरी रामकृष्ण सदाशिव खंडारे यांचा एक बैल वीज पडून जागीच ठार झाला आहे. रामकृष्ण खंडारे यांची बैलजोडी गोठय़ाच्या बाजूला असलेल्या झाडाखाली बांधलेली होती. या झाडावर वीज पडल्याने यामधील एक बैल ठार झाला आहे. काही दिवसांवर खरिप हंगाम येऊन ठेपला असून, पेरणीचे दिवस अस ताना शेतकर्याचे बैल ठार झाल्याने मोठे नुकसान झाले आहे. सुमारे ३0 ते ३५ हजार रुपये किमतीचे बैल असल्याची माहिती आहे.