शिर्डीत चोरलेल्या मोबाईलच्या वादातून गोळीबारात एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2016 08:59 AM2016-12-26T08:59:39+5:302016-12-26T09:00:38+5:30

शिर्डीत पाकिटमारांचे मनोबल दिवसेंदिवस वाढत आहे, काल रात्री चोरलेल्या मोबाईलच्या वादातून झालेल्या गोळीबारात युवक ठार झाला.

One killed in firing in Shirdi | शिर्डीत चोरलेल्या मोबाईलच्या वादातून गोळीबारात एक ठार

शिर्डीत चोरलेल्या मोबाईलच्या वादातून गोळीबारात एक ठार

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत

शिर्डी, दि. 26 - शिर्डीत पाकिटमारांचे मनोबल दिवसेंदिवस वाढत आहे, काल रात्री चोरलेल्या मोबाईलच्या वादातून झालेल्या गोळीबारात किसन आनंदा बागुल, वय-25 हा ठार झाला, शिर्डीतील शासकीय विश्रामगृहा जवळील चारीलगत ही घटना घडली.
 
किसनची आई सुमन बागुल यांनी याबाबत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, रात्री साडेदहा वाजता गोविंद विजय त्रिभुवन उर्फ मंडक्या, राहुल सुरेश पवार, शंकर विरण स्वामी उर्फ काळे, कुणाल चौधरी यांचे चोरीच्या मोबाईल वरून भांडण सुरु होते, हे भांडण सोडवण्यास गेलेला माझा मुलगा किसान यास यांनी लाथा बुक्क्यांनी मारहाण केली, व नंतर गोविंदाच्या सांगण्यावरुन शंकर विरेन याने गावठी कट्ट्यातून किसनच्या पोटात गोळी मारली, जखमी अवस्थेत हॉटेल न्यू शेरे पंजाब समोर पडलेल्या मुलांने ही घटना सांगितल्यानंतर त्याला तातडीने पोलीस ठाण्यात नेण्यात आले, तेथून पोलिसांच्या सांगण्यावरून साडेअकरा वाजता त्याला साईबाबा रुग्णालयात दाखल करण्यात आले, उपचारा दरम्यान साडेबारा वाजता किसनचा मृत्यू झाला,
 
यानंतर पोलीस उपअधीक्षक सागर पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे व पोलिसांनी कुणाल चौधरी यास ताब्यात घेतले आहे, अन्य आरोपीच्या तपासासाठी पोलीस पथके रवाना झाली आहेत, सकाळी पोलीस अधीक्षक सौरभ त्रिपाठी शिर्डीत दाखल झाले आहेत, या घटनेने शिर्डीत खळबळ उडाली आहे,

Web Title: One killed in firing in Shirdi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.