वांद्रे - वरळी सी लिंकवर अपघातात एकाचा मृत्यू, सहा गंभीर जखमी

By admin | Published: April 18, 2016 11:02 AM2016-04-18T11:02:06+5:302016-04-18T11:02:06+5:30

वांद्रे - वरळी सी लिकंवर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत

One killed, six seriously injured in accident in Worli Sea Link | वांद्रे - वरळी सी लिंकवर अपघातात एकाचा मृत्यू, सहा गंभीर जखमी

वांद्रे - वरळी सी लिंकवर अपघातात एकाचा मृत्यू, सहा गंभीर जखमी

Next
>ऑनलाइन लोकमत - 
मुंबई, दि. १८ - वांद्रे - वरळी सी लिकंवर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. रविवारी रात्री हा अपघात झाला आहे. जखमींना उपचारासाठी केईम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान अपघाताचा पंचनामा करण्यासाठी आलेल्या पोलीस कॉन्स्टेबलला कारने उडवले असल्याने गंभीर जखमी झाला आहे. जखमी पोलिस कॉन्स्टेबलवर बॉम्बे रुग्णालयात उपचार सुरु आहे. 
 
सीलिंकवर रात्री 12 च्या सुमारास भरधाव वेगाने जाणा-या सुमो कारने दुस-या कारला धडक दिली. अपघातानंतर धडक दिलेली कार डिव्हायडर जाऊन आदळली. सुमो कारमध्ये सातजण प्रवास करत होते. त्यांच्यातील एकाचा जागीच मृत्यू झाला तर सहा जण गंभीर जखमी झाले असून त्यांना केईएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे. धडक दिलेल्या कारमधील प्रवासी सुरक्षित आहेत
 
अपघातानंतर पंचनामा करण्यासाठी पोलिस पोहोचले होते मात्र त्याचवेळी एका भरधाव कारने पोलिस कॉन्स्टेबलला धडक दिली. जखमी पोलिस कॉन्स्टेबलवर बॉम्बे रुग्णालयात उपचार सुरु आहे. कारचालकाला ताब्यात घेऊन वैद्यकीय चाचणीसाठी पाठवण्यात आलं आहे. 
 

Web Title: One killed, six seriously injured in accident in Worli Sea Link

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.