सोलापुरात दरोडेखोरांच्या हल्ल्यात १ ठार, ३ पोलीस जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2018 09:56 PM2018-02-13T21:56:30+5:302018-02-13T21:56:36+5:30

खून आणि चोरीच्या घटनेतील संशयित दरोडेखोरांनी केलेल्या चाकू हल्ल्यात एकजण ठार झाला असून सोलापूर ग्रामीण पोलिस दलातील गुन्हे शाखेचे तीन पोलिस जखमी झाले आहेत.

One killed, three policemen injured in dacoity attack in Solapur | सोलापुरात दरोडेखोरांच्या हल्ल्यात १ ठार, ३ पोलीस जखमी

सोलापुरात दरोडेखोरांच्या हल्ल्यात १ ठार, ३ पोलीस जखमी

Next

सोलापूर -  खून आणि चोरीच्या घटनेतील संशयित दरोडेखोरांनी केलेल्या चाकू हल्ल्यात एकजण ठार झाला असून सोलापूर ग्रामीण पोलिस दलातील गुन्हे शाखेचे तीन पोलिस जखमी झाले आहेत. याप्रकारमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मंगळवारी सायंकाळी मोहोळ येथे ही घटना घडली असून जखमींना तातडीने सोलापूर येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

सोलापूर ग्रामीण पोलिस दलातील गुन्हा प्रकटीकरण पथकाचे पोलिस निरीक्षक कुंभार आणि त्यांच्या पथकाला मंगळवेढा तालुक्यातील घडलेल्या खून आणि दरोड्यातील संशयित आरोपी मोहोळ येथे येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार तीन पथके करून शहरातील विविध भागात दरोडेखोरांना पकडण्यासाठी सापळा लावण्यात आला होता. 

सायंकाळी आठच्या सुमारास शिवाजी चौकात तिघे संशयित दुचाकीवरून येत असल्याचे एका पथकाला दिसले. त्यावेळी या तिघांना अडविण्याचा प्रयत्न पथकातील कर्मचाऱ्यांनी यांनी केला. याचवेळी संशयित दरोडेखोरांपैकी एकाने चाकूने अचानक पथकावर हल्ला केला. यात पोलीस कर्मचारी सचिन मागाडे, बोंबीलवार आणि लालसिंह राठोड हे जखमी झाले तर रस्यावरून जाणारे अबु कुरेशी नावाचा इसमही या हल्ल्यात जखमी झाला. हल्ला करून तत्काळ तिघा संशयित दरोडेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला. यावेळी पोलिसांनी पाठलाग करून एकास पकडले असून उर्वरित दोघांची शोध मोहिम सुरू करण्यात आली आहे. 

दरम्यान हल्ल्यातील जखमींना तातडीने सोलापूर येतील रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असून कुरेशी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर पोलिस दलात खळबळ माजली असून मोठ्या प्रमाणात पोलिस दल मोहोळमध्ये दाखल झाले आहे.

Web Title: One killed, three policemen injured in dacoity attack in Solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.