खंडणीप्रकरणात अजून एक तक्रारदार
By admin | Published: May 18, 2017 12:05 AM2017-05-18T00:05:56+5:302017-05-18T00:05:56+5:30
अमरावतीच्या वाळू ठेकेदाराकडून १० लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी कोठडीत असलेल्या पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचा टायपीस्ट महेश सावंतसह वर्ध्यातून मनोज मनवटकरला
- लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अमरावतीच्या वाळू ठेकेदाराकडून १० लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी कोठडीत असलेल्या पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचा टायपीस्ट महेश सावंतसह वर्ध्यातून मनोज मनवटकरला अटक करण्यात आली. याप्रकरणात आणखी एक तक्रारदार पुढे आला
असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे याप्रकरणाला नवे वळण मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
राज्याचे पर्यावरण मंत्री आणि शिवसेना नेते यांच्या मलबार येथील शासकीय निवासस्थानातून सावंतने अमरावतीच्या वाळू ठेकेदाराला कॉल केला. त्यानंतर कदमांच्या नावाचा वापर करत १० लाखांची मागणी केली. पैसे न दिल्यास पर्यावरण आणि गृहविभागाकडून व्यवसाय बंद करण्याची धमकी दिली होती. त्यात गृहविविभागाकडून कारवाईची धमकी दिल्याने भितीने तक्रारदाराने काही रक्कम देण्यास होकार दिला. सावंतच्या सांगण्यावरुन याप्रकरणातील वर्धा येथून अटक करण्यात आलेल्या मनवटकरने तक्रारदाराकडून ५० हजार रुपये स्विकारले. दोघांनाही बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. याप्रकरणात आणखी एक तक्रारदार नव्यान समोर आला असल्याची माहिती समजते.
नवे वळण लागणार?
याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. त्यामुळे याप्रकरणाला नवे वळण मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र सध्या तरी अधिक तपास सुरु असल्याने नव्याने काहीही समोर आले नसल्याची माहिती पोलिसांनी दिली़