शिर्डीत रिकाम्या बाटलीस मिळणार एक रुपया! मंदिर परिसरात रिसायकलिंग यंत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2018 02:31 AM2018-09-07T02:31:11+5:302018-09-07T03:04:09+5:30
साईबाबा मंदिर परिसरात वापरलेल्या प्लॅस्टिकच्या बाटल्या पुनर्प्रक्रियेसाठी जमा करण्यात येणार आहेत़ त्यासाठी गुरुवारी साईबाबा मंदिर परिसरात पेट रिसायकलिंग मशिन बसवण्यात आले़ या मशिनमध्ये बाटली टाकल्यास भाविकाला एक रुपयाचे कुपन मिळणार आहे़
शिर्डी : साईबाबा मंदिर परिसरात वापरलेल्या प्लॅस्टिकच्या बाटल्या पुनर्प्रक्रियेसाठी जमा करण्यात येणार आहेत़ त्यासाठी गुरुवारी साईबाबा मंदिर परिसरात पेट रिसायकलिंग मशिन बसवण्यात आले़ या मशिनमध्ये बाटली टाकल्यास भाविकाला एक रुपयाचे कुपन मिळणार आहे़
स्वच्छ भारत मिशनअंतर्गत पेप्सीको इंडिया व जेम इन्व्हायरो मॅनेजमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने मंदिर परिसरात पेट रिसायकलिंग मशिन बसवण्यात आले़ खासदार दिलीप गांधी व साईबाबा संस्थानचे अध्यक्ष डॉ़ सुरेश हावरे यांच्या हस्ते या मशिनचा गुरुवारी लोकार्पण सोहळा झाला़
या पेट रिसायकलिंग मशिनमध्ये रिकामी कोणतीही प्लॅस्टिकची बॉटल टाकल्यास ती क्रॅश होऊन एक रुपयाचे कुपन मिळणार आहे. तसेच मशिनमध्ये हाताने प्रेस करून बाटली क्रॅश करण्याची सुविधा आहे़ यातूनही एक रुपयाचे कुपन मिळेल किंवा अॅप डाउनलोड करून घेतला तर मोबाईल व्हॅलेटमध्ये एक रुपया जमा होणार आहे. बाटल्यांचे रिसायकलिंग करून गारमेंट व बॅगा बनवण्यात येतात, असे सचिन शर्मा यांनी सांगतले़
राज्यात ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान
वाशिम : पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्यावतीने १५ सप्टेंबर ते २ आॅक्टोबर २०१८ या कालावधीत राज्यभरात ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान राबविले जाणार आहे. जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अखत्यारितील अधिकारी, कर्मचाºयांना स्वच्छतेची जबाबदारी दिली जाणार आहे.