भगव्याचे एक ‘नाथ’ नॉट रिचेबल

By admin | Published: August 8, 2014 12:32 AM2014-08-08T00:32:09+5:302014-08-08T00:32:09+5:30

या जिल्ह्यात पुत्रसह चार खासदार निवडून आणल्यामुळे सध्या सेव्हन-हेवनमध्ये असलेले आमदार एकनाथ शिंदे जनता व शिवसैनिकांसाठी नॉट रिचेबल झाले आहेत.

One of the saffron's 'nath' knot rechargeable | भगव्याचे एक ‘नाथ’ नॉट रिचेबल

भगव्याचे एक ‘नाथ’ नॉट रिचेबल

Next
>ठाणो : या जिल्ह्यात पुत्रसह चार खासदार निवडून आणल्यामुळे सध्या सेव्हन-हेवनमध्ये असलेले आमदार एकनाथ शिंदे जनता व शिवसैनिकांसाठी नॉट रिचेबल झाले आहेत. यामुळे सर्व संबंधित त्रस्त 
झाले असून त्यांच्याकडे जिल्हाप्रमुख आणि जिल्हासंपर्क प्रमुख तसेच आमदार असा तीन पदांचा असलेला भार कमी करावा, अशी मागणी शिवसेनेत दबत्या सुरात होऊ लागली आहे. केव्हाही फोन करा नॉट रिचेबल, किंवा नुसती रिंग जाणो असे प्रकार गेल्या अनेक महिन्यांपासून घडत आहेत. निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत. त्यामुळे अनेक महत्त्वाच्या बाबींवर त्यांच्याशी संपर्क साधणो तातडीचे असते आणि ठाणो जिल्हय़ाचे हे नाथ नेमके तेच अशक्य करून ठेवतात त्यामुळे कामे करायची कशी, असा प्रश्न शिवसैनिकांना आणि महायुतीच्या कार्यकत्र्यानाही पडला असून तो मातोश्रीर्पयत पोहोचला आहे. या नाथांचे कल्याण शिष्य असलेल्या ‘ब्लफ मास्टर सचिन’ यांच्याबद्दलची नाराजी तर उद्धवजींर्पयत गेली आहे.
त्यांना भेटणो हे मुश्कील झाले आहे. शिवसेनेच्या काही जुन्याजाणत्या नेत्यांनी सांगितले की, अनेक गोष्टी भेट घेऊन खाजगीत बोलायच्या असतात. परंतु आमचे हे जिल्हापती फोन घेत नाहीत. त्यांच्यार्पयत निरोप पोहोचत नाहीत. भेटीची वेळ मिळत नाही. त्यामुळे त्यांना सार्वजनिक कार्यक्रमात गाठण्यापलीकडे पर्याय उरलेला नाही. आलेले निरोप न पोहोचवणो हा त्यांचा जणू जन्मसिद्ध हक्कच मानतात. त्यामुळे जिल्हाप्रमुख अथवा संपर्कप्रमुख ही पदे दुस:या उत्साही आणि कार्यक्षम नेत्याकडे दिली तर संघटना अधिक मजबूत होईल. या नॉट रिचेबल नाथांना पदांची खैरात कशासाठी, असा सवाल शिवसैनिक दबत्या आवाजात सध्या करताना दिसतात. (विशेष प्रतिनिधी)
 
मातोo्रीकडूनही अशी वागणूक नाही
च्शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे तसेच मातोश्री हेदेखील आजवर कधी अशा उर्मट पद्धतीने वागलेले नाहीत. तिथे किमान फोन रिसीव्ह होतो, निरोप पोहोचवला जातो आणि उत्तरही येते.
 
च्स्वर्गीय आनंद दिघे हे तर आलेल्या प्रत्येक फोनला स्वीकारणो आणि उत्तर देणो याला अत्यंत महत्त्व द्यायचे. त्यामुळेच ते शिवसेनेची प्रभावी बांधणी जिल्ह्यात करू शकले आणि त्यांच्या पुण्याईवर आता जिल्हापती झालेले नाथा भाऊ नेमक्या त्याच गोष्टीकडे दुर्लक्ष करीत आहेत.
 
कार्यभार झेपत नसेल तर दुस:यांकडे सोपवा
च्सध्या राजकीय घडामोडी प्रचंड वेगाने घडत आहेत. मिनिटा-मिनिटाला संपर्काची गरज असते पण आमच्या जिल्हापतींनी संपर्कच तोडून टाकला आहे. 
च्त्यामुळे त्यांच्यावरील कार्यभार त्यांना ङोपेनासा झाला असेल तर तो कमी करून जो कार्यकत्र्याना सहज उपलब्ध होईल अशा नेत्याकडे सोपवावा, अशी मागणी शिवसैनिकांनी खाजगीत लोकमतशी बोलताना केली.
 
च्स्वत: आमदार, पुत्र खासदार आणि संघटनेतील दोन पदांचे तुरे प्राप्त झाल्यामुळे आपण जणू काही आता गॉडफादर झालो, असाच काहीसा सध्या जिल्हापतींचा नूर असतो. 

Web Title: One of the saffron's 'nath' knot rechargeable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.