ठरलं तर मग! नवीन शैक्षणिक वर्षात एक राज्य, एक गणवेश

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2023 06:12 AM2023-05-24T06:12:04+5:302023-05-24T06:12:22+5:30

पर्याय : ३ दिवस शाळेचा, ३ दिवस सरकारी 

One state, one uniform in the new academic year in Schools in Maharashtra | ठरलं तर मग! नवीन शैक्षणिक वर्षात एक राज्य, एक गणवेश

ठरलं तर मग! नवीन शैक्षणिक वर्षात एक राज्य, एक गणवेश

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क 
मुंबई : येणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून राज्यात ‘एक राज्य, एक गणवेश योजना’ राज्य सरकार राबविण्याच्या तयारीत आहे. याअंतर्गत राज्यातील सर्व सरकारी शाळांना एकच गणवेश लागू असेल. मात्र, काही शाळांनी या निर्णयापूर्वीच कपड्यांच्या ऑर्डर दिल्याने विद्यार्थी तीन दिवस सरकारी योजनेचा  आणि तीन दिवस शाळेने निर्धारित केलेला गणवेश वापरतील, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक  केसरकर यांनी दिली आहे. 

या योजनेमुळे २५ हजार सरकारी शाळांतील ६४ लाख २८ हजार विद्यार्थी एकाच गणवेशात दिसतील. काही शाळांनी कपड्यांची ऑर्डर दिल्यामुळे अशा शाळांमध्ये शाळेने ठरवून दिलेला गणवेश विद्यार्थी सोमवार, मंगळवार आणि बुधवार, असे तीन दिवस परिधान करतील, तर सरकारने ठरवून दिलेला गणवेश हा गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार, असे तीन दिवस परिधान करतील, असे केसरकर यांनी सांगितले. यासाठी वर्षाला ३८५ कोटींचा 
खर्च येईल. गणवेशासाठी निविदा काढल्या जातील, असेही ते म्हणाले.

    ...असा असेल गणवेश 
n आकाशी रंगाचा शर्ट आणि गडद निळ्या रंगाची पँट. मुलींना आकाशी रंगाचा शर्ट आणि डार्क निळ्या रंगाचा स्कर्ट असेल. 
n शाळांमध्ये सलवार- कमीज असेल, तर सलवार गडद निळे, कमीज आकाशी रंगाचा असेल. मुलांना सामाजिक बांधीलकीची जाणीव असावी, या भावनेतून हा निर्णय घेतला आहे. 
n बूट-मोजेही देण्यात येतील. सर्व शासकीय शाळांतील सर्व मुलांना गणवेश दिला जाईल. खासगी शाळांतील मुलांनाही गणवेश देण्याचा मानस असल्याचेही केसरकर म्हणाले. 

Web Title: One state, one uniform in the new academic year in Schools in Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.