CoronaVirus News: मुंबई, पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी; 'त्या' भागांमधील एक तृतीयांश नागरिकांना कोरोना?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2020 01:56 PM2020-06-09T13:56:51+5:302020-06-09T14:09:54+5:30

कोरोना रुग्णांची संख्या जास्त असलेल्या शहरांमध्ये आयसीएमआरचं सर्वेक्षण

One third of Indians may have been infected by coronavirus says ICMR study | CoronaVirus News: मुंबई, पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी; 'त्या' भागांमधील एक तृतीयांश नागरिकांना कोरोना?

CoronaVirus News: मुंबई, पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी; 'त्या' भागांमधील एक तृतीयांश नागरिकांना कोरोना?

Next

मुंबई: देशातील कोरोना हॉटस्पॉट आणि कंटेन्मेंट झोनमधील एक तृतीयांश लोकांना कोरोनाची लागण झाली असावी, अशी शक्यता भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं (आयसीएमआर) व्यक्त केली आहे. एक तृतीयांश नागरिकांना कोरोनाची बाधा झाली असावी. मात्र त्यातून ते बरे झाले असावेत, असं आयसीएमआरनं एका सर्वेक्षणात म्हटलं आहे. मात्र आयसीएमआरनं अद्याप हा अहवाल प्रसिद्ध केलेला नाही. इंडिया टुडेनं याबद्दलचं वृत्त दिलं आहे. मुंबई, पुण्यात हॉटस्पॉटची संख्या जास्त असल्यानं आयसीएमआरचा अहवाल राज्याच्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे.

कंटेन्मेंट झोन्स आणि हॉटस्पॉट्समधील १५ ते ३० टक्के व्यक्तींना कोरोनाची लागण झाली असण्याची शक्यता आहे. या व्यक्ती कोरोना विषाणूच्या संपर्कात आल्या असाव्यात, असं आयसीएमआरनं अहवालात नमूद केलं आहे. ही माहिती केंद्रीय कॅबिनेट सचिव आणि पंतप्रधान कार्यालयाला पाठवण्यात आली आहे. देशातील इतर भागांतील हॉटस्पॉट्सच्या तुलनेत मुंबई, पुणे, दिल्ली, अहमदाबाद आणि इंदूरमधील कोरोना संसर्गाचं प्रमाण १०० पटीनं जास्त असल्याची गंभीर बाब अहवालात नमूद करण्यात आली आहे. 

आयसीएमआरनं सर्वाधिक धोका असलेल्या भागांमधील संसर्गाचं प्रमाण तपासून पाहण्यासाठी एक महत्त्वाचं सर्वेक्षण केलं. यासाठी मुंबई, ठाणे, पुणे, अहमदाबाद, सूरत, दिल्ली, कोलकाता, इंदूर, जयपूर आणि चेन्नई या १० शहरांमधून नमुने घेण्यात आले. प्रत्येक शहरातल्या १० कंटेन्मेंट झोनमधून प्रत्येकी ५०० नमुने घेण्यात आले. याशिवाय २१ राज्यांमधल्या ६० जिल्ह्यांतून प्रत्येकी ४०० नुमने घेण्यात आले होते. कोरोना रुग्णांची संख्या जास्त, मध्यम आणि कमी असलेल्या भागांमधून नमुने गोळा करण्यात आले होते. 

देशातील एकूण रुग्णांपैकी ७० टक्के रुग्ण मुंबई, ठाणे, पुणे, अहमदाबाद, सूरत, दिल्ली, कोलकाता, इंदूर, जयपूर आणि चेन्नईमध्ये आहेत. देशातील कोरोना रुग्णांचा आकडा २ लाख ६५ हजारांच्या पुढे गेला आहे. सध्याच्या घडीला भारत कोरोना रुग्णांच्या बाबतीत जगात सहाव्या स्थानी आहे. भारतापेक्षा जास्त कोरोना रुग्ण अमेरिका, ब्राझील, रशिया, स्पेन आणि ब्रिटनमध्ये आहेत. 

…अन् ३ वर्षाच्या चिमुरडीला थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे फोन लावतात; ऑडिओ क्लीप व्हायरल

महाराष्ट्र सरकारला सर्कस संबोधणाऱ्या राजनाथ सिंहांना ठाकरे सरकारने दिलं जोरदार प्रत्युत्तर

Web Title: One third of Indians may have been infected by coronavirus says ICMR study

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.