Vidhan Parishad Election: भाजपसाठी एकेक मत महत्वाचे! लक्ष्मण जगताप पुण्याहून अँबुलन्समधून रवाना
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2022 11:02 AM2022-06-20T11:02:58+5:302022-06-20T11:04:05+5:30
Maharashtra Vidhan Parishad Election: भाजपाचे आमदार सर्वात आधी विधानभवनात पोहोचले होते. यामुळे भाजपाच्या जवळपास ८४ आमदारांनी आतपर्यंत मतदान केले आहे.
भाजपासाठी एकेक मत महत्वाचे झाले आहे. शिवसेनेसह राष्ट्रवादी, काँग्रेसच्या उमेदवारांसाठी मतांची जुळवाजुळव झाली आहे. असे असताना राष्ट्रवादीचे तुरुंगात असलेले मंत्री नवाब मलिक, आमदार अनिल देशमुख यांना कोर्टाने मतदान करण्याचे नाकारले आहे. यामुळे भाजपाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
अशातच भाजपाचे आजारी असलेले पुणे, पिंपरी चिंचवडमधील दोन आमदार मुंबईकडे निघाले आहेत. मुक्ता टिळक या सकाळीच मुंबईकडे रवाना झाल्या. परंतू, लक्ष्मण जगताप हे अँम्बुलन्समधून मुंबईकडे रवाना झाले आहेत.
भाजपाचे आमदार सर्वात आधी विधानभवनात पोहोचले होते. यामुळे भाजपाच्या जवळपास ८४ आमदारांनी आतपर्यंत मतदान केले आहे. तर राष्ट्रवादीच्या आमदारांनीही आता मतदानासाठी सुरुवात केली असून आतापर्यंत एकूण १५६ आमदारांचे मतदान झाले आहे. राष्ट्रवादीच्या ४५ आमदारांनी मतदान केले आहे.
शिवसेना आमदारांची बस वाहतूक कोंडीत अडकली होती. यामुळे शिवसेना आमदार उशिराने विधानभवनात पोहोचली आहे. दुसरी बस आताच विधानभवनात पोहोचली आहे. एका बसमध्ये आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे होते. त्यांच्या काही वेळ आधीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पोहोचले होते. शिवसेना आमदार उशिरा आल्याने आता त्यांना मतदानासाठी थांबावे लागणार आहे. तत्पूर्वी शिवसेना आमदारांशी ठाकरे चर्चा करणार आहेत.
राज्यसभा निवडणुकीवेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष्मण जगताप, मुक्ता टिळक यांना लढवय्ये आमदार म्हणत त्यांना हा विजय समर्पित केला होता.