कांदा उकिरड्यावऱ़!

By admin | Published: September 24, 2016 01:13 AM2016-09-24T01:13:31+5:302016-09-24T01:13:31+5:30

कांदा पिकाने या वर्षी शेतकऱ्यांना रडवले. मातीमोल भावात कांदा विकला गेल्याने कांदा उत्पादक शेतकरी तोट्यात गेला

Onion boiled! | कांदा उकिरड्यावऱ़!

कांदा उकिरड्यावऱ़!

Next


घोडेगाव : कांदा पिकाने या वर्षी शेतकऱ्यांना रडवले. मातीमोल भावात कांदा विकला गेल्याने कांदा उत्पादक शेतकरी तोट्यात गेला. सध्या कांदा बराखीतून काढून बाजारात विक्रीसाठी नेण्याचा खर्चदेखील परवडत नसल्याने शेतकरी कांदा बाहेर काढत नाहीत. त्यामुळे बराखीत खराब होऊ लागलेला कांदा उकिरड्यावर फेकल्याशिवाय त्याच्याकडे पर्याय राहिला नाही.
मागील वर्षी कांद्याला उच्चांकी भाव मिळाल्याने या वर्षी मोठ्या प्रमाणात कांदा पीक घेतले. भाव मिळेल या अपेक्षेने छोट्या-मोठ्या सर्वच शेतकऱ्यांनी बराखीत कांदा साठवून ठेवला. मात्र, सुरुवातीपासून भाव वाढलाच नाही. मध्यंतरी १० किलोला १३० ते १४० रुपयांपर्यंत उच्चांकी भाव मिळाला. त्यानंतर ७० ते ८० रुपयांपर्यंत भाव राहिला. यामध्ये वाढ होईल या अपेक्षेने शेतकऱ्यांनी कांदा बाहेर काढलाच नाही. सध्या ५० ते ६० रुपये चांगल्या कांद्याला भाव मिळत नाही. (वार्ताहर)
>सध्या कांदा बाजारात नेण्यासाठीही परवडत नाही. कांदा बराखीतून बाहेर काढायचा, माणसांकडून निवडून घ्यायचा, पिशव्यांमध्ये भरायचा, गाडीने बाजारात विक्रीसाठी न्यायचा, बाजारात दलाली, हमाली, कटाई या सर्व खर्चात कांदा बाजारात विक्रीसाठी नेणेदेखील परवडत नाही. त्यामुळे शेतकरी कांदा बराखीतून बाहेरच काढत नाही.
>सध्याच्या वातावरणामुळे कांदा बराखीतच खराब होऊ लागला असून, पूर्ण बराख्या उद्ध्वस्त होऊ लागल्या आहेत. अशा परिस्थितीत खराब झालेला कांदा उकिरड्यावर खतासाठी फेकून देण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. अनेक शेतकरी खराब झालेला कांदा फेकून देऊ लागले आहेत.

Web Title: Onion boiled!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.