कांद्याने भाव खाल्ला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2017 03:44 AM2017-07-27T03:44:45+5:302017-07-27T03:46:06+5:30
टोमॅटोपाठोपाठ जिल्ह्यातील बाजार समितीत चांगल्या प्रतीच्या कांद्याला बुधवारी १,०५० ते १,२२० रुपये प्रतिक्विंटल, तर सरासरी ९७० रुपये बाजारभाव मिळाला. सप्टेंबरमध्ये नवे पीक येईपर्यंत कांदा चांगलाच भाव खाण्याची चिन्हे आहेत.
नाशिक : टोमॅटोपाठोपाठ जिल्ह्यातील बाजार समितीत चांगल्या प्रतीच्या कांद्याला बुधवारी १,०५० ते १,२२० रुपये प्रतिक्विंटल, तर सरासरी ९७० रुपये बाजारभाव मिळाला. सप्टेंबरमध्ये नवे पीक येईपर्यंत कांदा चांगलाच भाव खाण्याची चिन्हे आहेत.
कांद्याला वर्षभरात पहिल्यांदाच चांगले दर मिळाल्याने शेतकरी सुखावला आहे. शासनाने आॅगस्टअखेरची निर्यातीची परवानगी पुढे सुरू ठेवण्याची मागणी कांदा उत्पादक करत आहेत. यंदा जुलैअखेर कांदा उत्पादक शेतकºयांना ‘अच्छे दिन’ आले आहेत. मध्य प्रदेशात कांदा गडगडल्याने तेथील शासनाने शेतकºयांकडून ८०० रु पये प्रतिक्विंटल भावाने कांदा खरेदी केला. तोच कांदा शासनाने झळ सोसून ३०० ते ३५० रुपये दराने बाजारात आणला.
कळवणला १,२२१ रुपये क्विंटल
कळवण कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत उपबाजार आवार कनाशी येथे कांद्याला १,२२१ रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला.
लासलगावला १,१११ रुपये क्विंटल
लासलगांव कांदा बाजारपेठेत या हंगामातील सर्वाधिक कांद्याला १,१११ रुपये प्रतिक्विंटल भाव जाहीर झाला. ४५ रुपयांची तेजी होती.
आॅगस्टमध्ये १५०० रुपये क्विंटल भाव?
१० जुलैला मध्य प्रदेश सरकारने हमी भावाची कांदा खरेदी बंद केली. शिवाय राजस्थान, गुजरात, आसाम राज्यांत पुरामुळे कांदा खराब झाला. त्यामुळे महाराष्ट्राच्या कांद्याला मागणी वाढली आणि हळूहळू कांद्याला चांगले दिवस येऊ लागले आहे. आॅगस्टच्या मध्यापर्यंत किमान १,५०० रुपये प्रतिक्विंटल कांद्याला भाव येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.