कांदा घसरला !
By admin | Published: February 25, 2016 03:15 AM2016-02-25T03:15:49+5:302016-02-25T03:15:49+5:30
येथील बाजार समितीत कांद्याच्या भावात मंगळवारच्या तुलनेत बुधवारी कमाल भावात क्विंटलमागे तब्बल ११० रुपये घसरण झाली. मंगळवारी ९९४ रुपये असलेला कमाल
लासलगाव : येथील बाजार समितीत कांद्याच्या भावात मंगळवारच्या तुलनेत बुधवारी कमाल भावात क्विंटलमागे तब्बल ११० रुपये घसरण झाली. मंगळवारी ९९४ रुपये असलेला कमाल भाव बुधवारी ८५० रुपयांवर आले. बुधवारी बाजार समिती आवारात ७५० वाहनांतून कांद्याची आवक झाली. कमाल दर ३५० ते ८५० रुपये तर सर्वसाधारण भाव ७०० रुपये होते.
परराज्यात कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक होत असल्याने नाशिक जिल्ह्यातील कांद्याच्या मागणीत घट झाली आहे. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या भावात घसरण होऊन एप्रिल २०१५ नंतर प्रथमच कांद्याचे दर क्विंटलमागे एक हजार रु पयांपेक्षा कमी झाल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघेनासा झाला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा लाल कांद्याची तिपटीने लागवड झाली होती. जिल्ह्यात दोन महिने पाऊस उशिरा झाल्याने लाल कांद्याची आवक उशिरा झाली. त्यातच गुजरात आणि कर्नाटकमध्ये कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात होत असल्याने देशांतर्गत बाजारपेठेत जिल्ह्यातील कांद्याच्या मागणीत घट झाली आहे.
तोट्यातच कांदा विक्री
कांद्याचे भाव ५ डिसेंबरपर्यंत टिकून होते. मात्र त्यानंतर भाव घसरण्यास सुरु वात झाली. २७ जानेवारीपर्यंत १,१०० रुपयांपर्यंत सरासरी भावाने कांदा विक्र ी होत होती.
२८ जानेवारीपासून भावात घसरण होत कांदा ८५० रु पयांपर्यंत खाली आला आहे. उत्पादन खर्च प्रतिक्विंटल ९०० रु पयापर्यंत येत असून वाहतुकीवर १०० रु पये खर्च येतो. त्यामुळे शेतकऱ्यांना क्विंटलमागे २५० रु पये नुकसान होत आहे.
सप्ताहात लाल कांद्याची ८४,४३८ क्विंटल आवक होऊन बाजारभाव ४०० ते १,१३१ रु पये एवढे राहिले, तर सरासरी ७५० रुपये होते. उन्हाळ कांद्याची ११२ क्विंटल आवक होऊन बाजारभाव ६६१ ते १०८१ रुपये, तर सरासरी ९०५ रुपये प्रतिक्विंटल राहिले.