कांद्याचे अनुदान फेब्रुवारीत मिळणार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2019 02:20 AM2019-01-28T02:20:31+5:302019-01-28T02:20:47+5:30
प्रतिक्विंटल २०० रुपये; ८ ते ९ हजार शेतकऱ्यांनी अर्ज केले
पुणे : कांद्याचे दर पडल्याने अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल २०० रुपये अनुदान देण्यासाठी बाजार समित्यांमार्फत २५ जानेवारीपर्यंत कांदा उत्पादक शेतकºयांकडून अनुदान देण्यासाठीचे अर्ज स्वीकारले. पुणे जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये केवळ ८ ते ९ हजार शेतकऱ्यांनी अर्ज केले असून, येत्या फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा केले जाणार आहे.
राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्या व काही खासगी बाजार समितीमध्ये १ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर २०१८ या कालावधीत कांद्याची विक्री केलेल्या कांदा उत्पादक शेतकºयांना राज्य शासनातर्फे अनुदान दिले जाणार आहे. यासाठी येत्या १५ जानेवारीपर्यंत बाजार समित्यांमध्ये अर्ज स्वीकारले. मात्र, आवश्यक कागदपत्रे जमा करण्यास वेळ लागत असल्याने पणन संचालक कार्यालयातर्फे २५ जानेवारीपर्यंत अर्ज सादर करण्यासाठी मुदत वाढविली. १५ जानेवारीपर्यंत सुमारे सव्वालाख शेतकºयांचे अर्ज प्राप्त झाले होते. पुढील दोन ते तीन दिवसांत २५ जानेवारीपर्यंत किती शेतकºयांनी अर्ज केले आहेत, याबाबतची माहिती उपलब्ध होणार आहे. राज्यातील सर्व बाजार समितीमध्ये अनुदान अर्जासाठी स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात आले आहेत. शासनातर्फे शेतकºयांना २०० क्विंटल मर्यादेपर्यंत प्रतिक्विंटल २०० रुपये अनुदान दिले जाणार आहे.
जिल्हा उपनिबंधक (ग्रामीण) अनंत कटके म्हणाले की, पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अनेक शेतकºयांनी या कालावधीत कांदा विक्री केली. काही शेतकºयांकडे कांदा विक्रीच्या दोन हे तीन पट्ट्या होत्या. मात्र, प्रत्येक शेतकºयाकडून केवळ एकच अर्ज स्वीकारला गेला. त्यातच कोल्हापूर, अहमदनगर, सातारा यांसह इतर जिल्ह्यांमधील शेतकºयांनीसुद्धा पुण्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची विक्री केली; मात्र अनेक शेतकºयांनी अनुदानासाठी अर्ज
केले नाहीत.
सहा कोटी निधीचा प्रस्ताव
शेतकºयांकडून अजूनही अर्ज स्वीकारले जात असून, अर्ज स्वीकृतीसाठी शासनाकडून मुदत वाढवून घेण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत; परंतु २५ जानेवारीपर्यंत पुण्यात अर्ज केलेल्या ८ ते ९ हजार शेतकºयांना फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अनुदानाची रक्कम वितरित केली जाणार आहे. त्यासाठी ६ कोटी रुपये निधी मागणीचा प्रस्ताव पणन संचालक कार्यालयास सादर केला आहे.
शेतकºयांना २५ जानेवारीपर्यंत अर्ज करण्यास मुदत देण्यात आली होती. पुढील दोन दिवसांत राज्यातील एकूण किती शेतकºयांनी अनुदानासाठी अर्ज केले आहे, याबाबतची माहिती प्राप्त होईल. अर्ज केलेल्या शेतकºयांना पहिल्या टप्प्यात अनुदानाची रक्कम दिली जाईल.
- दीपक तावरे,
पणन संचालक