कांदा गडगडला! नाशिकमध्ये आवक वाढली; क्विंटलला १,३०० पर्यंत भाव खाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 04:47 AM2017-09-11T04:47:20+5:302017-09-11T04:49:48+5:30
महिनाभरापूर्वी ‘भाव’ खाऊन असलेला कांदा जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये वाढलेल्या आवकेमुळे गडगडण्यास सुरुवात झाली आहे. नवीन कांदा बाजारात येईपर्यंत तेजीच्या अपेक्षेवर असलेले शेतकरी भाव पडल्यामुळे चिंतेत आहेत.
नाशिक : महिनाभरापूर्वी ‘भाव’ खाऊन असलेला कांदा जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये वाढलेल्या आवकेमुळे गडगडण्यास सुरुवात झाली आहे. नवीन कांदा बाजारात येईपर्यंत तेजीच्या अपेक्षेवर असलेले शेतकरी भाव पडल्यामुळे चिंतेत आहेत.
सध्या प्रतिक्विंटल १,२०० ते १,५०० रुपये भाव झाले आहेत. त्यामुळे शेतकºयांकडून कमी भावाने खरेदी करून व्यापाºयांकडून त्याची साठवणूक करून ठेवण्याची शक्यता नाकारता येत नाही. कांदा पिकविणाºया राज्यांमध्ये पुरामुळे मालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. परिणामी देशांतर्गत कांद्याची मागणी वाढली.
गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे भाव वाढल्यामुळे केंद्र सरकारने देशांतर्गत बाजारभाव आवाक्यात ठेवण्यासाठी परदेशातून कांदा आयात करण्याचा निर्णय घेतला. इजिप्तहून काही प्रमाणात कांद्याची आयातही झाली. त्यामुळे कांद्याला भाव न मिळण्याच्या भीतीपोटी शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात बाजारात कांदा आणला आहे.
ग्राहकांना फायदा नाहीच
घाऊक बाजारात कांद्याचे दर कमी झाले असले तरी त्याचा थेट फायदा ग्राहकांना होत नाही. किरकोळ बाजारात कांदा ३० ते ३५ रुपये किलोच आहे.