कांद्याचे भाव झाले कमी; १० हजारांवरून ७ हजारांवर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2020 08:36 AM2020-10-23T08:36:33+5:302020-10-23T08:36:54+5:30

सोलापूर बाजार समितीत सर्वाधिक दर ७ हजार ५०० रुपये मिळाला. उमराणा बाजार समितीत मंगळवारी ८ हजार ६००रुपयावर गेलेला कांदा गुरुवारी ८ हजारावर आला. लासलगाव बाजार समितीत ७ हजार ८०० रुपयाने विक्री झालेला कांदा गुरुवारी ७ हजारावर आला.

Onion prices down From 10 thousand to 7 thousand | कांद्याचे भाव झाले कमी; १० हजारांवरून ७ हजारांवर

कांद्याचे भाव झाले कमी; १० हजारांवरून ७ हजारांवर

Next

सोलापूर : एकीकडे कांदा दीर्घकाळ भाव खाणार, असा कयास व्यापारी व्यक्त करीत असतानाच गुरुवारी जवळपास सर्वच बाजार समित्यांमध्ये कांदा दरात घसरण झाली. क्विंटलला १० हजारावर उसळी घेतलेल्या दर सात हजारावर आला.

सोलापूर बाजार समितीत सर्वाधिक दर ७ हजार ५०० रुपये मिळाला. उमराणा बाजार समितीत मंगळवारी ८ हजार ६००रुपयावर गेलेला कांदा गुरुवारी ८ हजारावर आला. लासलगाव बाजार समितीत ७ हजार ८०० रुपयाने विक्री झालेला कांदा गुरुवारी ७ हजारावर आला.

चांदवड बाजार समितीत ७ हजार ८०० रुपयांवर गेलेला दर गुरुवारी ७ हजार २०० रुपये झाला. तर अहमदनगर बाजार समितीत ९ हजार १०० रुपये इतका दर मिळाला होता. तो गुरुवारी ७ हजार ५०० रुपये झाला. पिंपळगाव बसवंत बाजार समितीत मात्र दरात सुधारणा झाली असून मंगळवारी ७ हजार ९०० रुपयावर गेलेला दर गुरुवारी ८ हजार रुपयांवर चढला. नगर बाजार समितीतही मोठी आवक झाल्याने दर पडले होते.
 
Web Title: Onion prices down From 10 thousand to 7 thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.