कांद्याचे दर गेले शंभरीपार, आयातीचे नियम शिथिल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2020 03:07 AM2020-10-22T03:07:54+5:302020-10-22T06:59:36+5:30

कांद्याचे दर १ ऑक्टोबरला १० ते २० रुपये प्रतिकिलो होते. २० दिवसांत हे दर चार ते पाच पट वाढले आहेत. दसऱ्यापूर्वीच कांद्याने शंभरी गाठली आहे.

Onion prices have gone up by hundreds | कांद्याचे दर गेले शंभरीपार, आयातीचे नियम शिथिल

कांद्याचे दर गेले शंभरीपार, आयातीचे नियम शिथिल

Next

नवी मुंबई :मुंबईत कांद्याचा तुटवडा सुरूच आहे. बुधवारी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (एपीएमसी) फक्त ५४७ टन आवक झाली असून होलसेल मार्के टमध्ये ५० ते ८० रुपये तर किरकोळ मार्केटमध्ये ८० ते ११० रुपये किलो दराने कांदा विकला गेला.

कांद्याचे दर १ ऑक्टोबरला १० ते २० रुपये प्रतिकिलो होते. २० दिवसांत हे दर चार ते पाच पट वाढले आहेत. दसऱ्यापूर्वीच कांद्याने शंभरी गाठली आहे. राज्यात सर्वच बाजार समितींमध्ये आवक घसरली आहे. घाऊक बाजार समितींमध्ये मुंबई ५० ते ८०, कोल्हापूर २२ ते ७०, पुणे १० ते ७५, औरंगाबाद १० ते ७५, लासलगाव १६ ते ७१ रुपये असे काद्यांचे भाव आहेत.

आयातीचे नियम शिथिल -
कडाडलेल्या किमती कमी करण्यास तसेच पुरवठा वाढविण्याकरिता केंद्र सरकारने कांद्याच्या आयातीचे नियम १५ डिसेंबरपर्यंत शिथिल केले. केंद्र सरकार आपल्याकडील कांदाही बाजारात आणणार आहे. खरिपात पिकलेला ३७ लाख टन कांदाही बाजारपेठेत येणार असून त्यामुळेही किमती कमी होण्यास मदत होईल, असा सरकारचा दावा आहे.
 

Web Title: Onion prices have gone up by hundreds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.