चाकण बाजारात कांद्याचे भाव वाढले ५०० रुपयांनी, बाजारात चक्क दोन फुटाचे गाजर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2017 01:27 PM2017-12-31T13:27:48+5:302017-12-31T13:27:59+5:30

चाकण : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटयार्ड मध्ये कांद्याची आवक वाढूनही भावात वाढ झाली. मागील आठवड्याच्या तुलनेत कांदा-बटाट्याच्या भावात ५०० रुपयांनी वाढ झाली

Onion prices rose by Rs 500 per kg in the market, and two-oyi carrot in the market | चाकण बाजारात कांद्याचे भाव वाढले ५०० रुपयांनी, बाजारात चक्क दोन फुटाचे गाजर

चाकण बाजारात कांद्याचे भाव वाढले ५०० रुपयांनी, बाजारात चक्क दोन फुटाचे गाजर

Next

हनुमंत देवकर
चाकण : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटयार्ड मध्ये कांद्याची आवक वाढूनही भावात वाढ झाली. मागील आठवड्याच्या तुलनेत कांदा-बटाट्याच्या भावात ५०० रुपयांनी वाढ झाली. बाजारात चक्क दोन फुटापेक्षाही जास्त लांबीच्या गाजराची आवक झाली आहे. ३१ डिसेंबर मुळे सलाड साठी लागणाऱ्या काकडी, गाजर, बिट, टोमॅटो, लिंबु व कांद्याचे भाव कडाडले. बाजारातील एकुण उलाढाल ३ कोटी ६० लाख रुपये झाली.

चाकण बाजारात कांद्याची एकूण आवक ३५५० क्विंटल झाली. मागील आठवड्याच्या तुलनेत भावात ५०० रुपयांनी वाढ झाली. कांद्याचा कमाल भाव ३००० रूपयांवरून ३५०० रुपयांवर स्थिरावला. तळेगाव बटाट्याची एकूण आवक ८५० क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक घटून बटाट्याचा कमाल भाव ८५० रुपये प्रतीक्विंटलवर स्थिरावला. भूईमुग शेंगाची एकूण आवक १५ क्विंटल झाली. शेंगांचा कमालभाव ६००० रुपयांवर स्थिर राहिला. लसणाची एकूण आवक २२ क्विंटल झाली असून, लसणाचा कमाल भाव ४ रुपयांवर स्थिर राहिला. चाकण बाजारात हिरव्या मिरचीची एकूण आवक ३४२ पोती झाली असून, हिरव्या मिरचीचा कमालभाव ४००० रुपयांवर स्थिर राहिला. टोमॅटोची आवक ७४२ क्रेट होऊन ७०० ते १४०० रुपये भाव मिळाला.

राजगुरूनगर येथील मुख्य बाजारात मेथीची २ लाख ८० हजार जुड्यांची आवक होऊन २०० ते ७०१ रुपये प्रती शेकडा जुड्यांना भाव मिळाला. कोथिंबीर ३ लाख ५ हजार जुड्यांची आवक होऊन १०० ते ७५१ रुपये असा प्रतिशेकडा जुड्यांना भाव मिळाला. शेपूची ७० हजार जुड्यांची आवक होऊन २०० ते ७५१ रुपयांचा भाव मिळाला.

शेतीमालाची एकूण आवक व बाजारभाव पुढील प्रमाणे :–
कांदा - एकूण आवक - ६११० क्विंटल. भाव क्रमांक १ : ३५०० रुपये, भाव क्रमांक : ३००० रुपये,  भाव क्रमांक ३ : २००० रुपये.
बटाटा - एकूण आवक - ८५० क्विंटल. भाव क्रमांक १ : १००० रुपये, भाव क्रमांक २ : ७०० रुपये, भाव क्रमांक ३ : ४०० रुपये.
लसूण - एकूण आवक - २२ क्विंटल. भाव क्रमांक १ : ४००० रुपये, भाव क्रमांक २ : ३५०० रुपये, भाव क्रमांक ३ : ३००० रुपये.

फळभाज्या :-
-------------
चाकण येथील फळभाज्यांच्या बाजारात एकूण आवक डागांमध्ये व प्रती १० किलोंसाठी डागाना मिळालेले भाव पुढील प्रमाणे :-
टोमॅटो - ७४२ पेट्या ( ७०० ते १४०० रू. ), कोबी - २८२ पोती ( ८०० ते १२०० रू. ), फ्लॉवर - ३१८ पोती ( ८०० ते १४०० रु.),
वांगी - १९० पोती ( २००० ते ३००० रु.), भेंडी - ३९५ पोती ( ३००० ते ४००० रु.), दोडका - १४५ पोती ( ३००० ते ४००० रु.),
कारली - १९० डाग ( ३५०० ते ४५०० रु.),  दुधीभोपळा - २५२ पोती ( १००० ते २००० रु.), काकडी - २४५ पोती ( १००० ते २००० रु.),
फरशी - ८० पोती ( ४००० ते ५००० रु.), वालवड - ३१० पोती ( १००० ते ३००० रु.), गवार - ७२ पोती ( ४००० ते ५००० रू.),
ढोबळी मिरची - २८२ डाग ( २००० ते ३००० रु.), चवळी - ११२ पोती ( २५०० ते ३५०० रुपये ), वाटाणा - ७१५ पोती ( २००० ते ३००० रुपये),
शेवगा - ७४ डाग ( ४००० ते ६००० रु. ) गाजर - १०० पोती ( १६० ते १८० रु. )

पालेभाज्या :–
--------------
चाकण येथील पालेभाज्यांच्या बाजारात भाज्यांची एकूण आवक जुड्यांमध्ये व प्रती शेकडा जुड्यांना मिळालेले भाव पुढील प्रमाणे : -
मेथी - एकूण २६४७० जुड्या ( ३०० ते ६०० रुपये ), कोथिंबीर - एकूण २९३८२ जुड्या ( २०० ते ६०० रुपये ),
शेपू - एकुण ५५९० जुड्या ( २०० ते ५०० रुपये ), पालक - एकूण ७८८० जुड्या ( ३०० ते ४०० रुपये ).

जनावरे :-
-----------
चाकण येथील जनावरांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या ११८ जर्शी गायींपैकी ७२ गाईची विक्री झाली. ( १५००० ते ५,६००० रुपये ),
१९५ बैलांपैकी ११८ बैलांची विक्री झाली. ( १०,००० ते ३०,००० रुपये ), १४५ म्हशींपैकी १०७ म्हशींची विक्री झाली. ( २०,००० ते ६०,००० रुपये ),
शेळ्या - मेंढ्यांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या १२३१० शेळ्या - मेंढ्यापैकी ११२२० मेंढ्यांची विक्री होऊन त्यांना १५०० ते १०,००० रुपये इतका भाव मिळाला. जनावरांच्या बाजारात २ कोटी ५५ लाखाची उलाढाल झाली.

Web Title: Onion prices rose by Rs 500 per kg in the market, and two-oyi carrot in the market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे