किरकोळ बाजारात कांदा १00 रुपयांच्या आतच; आवक वाढल्याने दर आवाक्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2019 05:11 AM2019-12-03T05:11:58+5:302019-12-03T05:15:01+5:30

मुंबई, ठाण्यात किरकोळ बाजारात मध्यम दर्जाचा कांदा ७0 ते ८0 रुपये किलोने विकला जात आहे.

Onion in retail for under Rs. 100; Incoming rates increase | किरकोळ बाजारात कांदा १00 रुपयांच्या आतच; आवक वाढल्याने दर आवाक्यात

किरकोळ बाजारात कांदा १00 रुपयांच्या आतच; आवक वाढल्याने दर आवाक्यात

Next

नाशिक/सोलापूर/नगर : राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सोमवारी उन्हाळ कांद्याचे दर क्विंटलला सरासरी ९ ते १० हजार रुपये कायम होते. मात्र, बाजारात आता लाल कांद्याची आवक होऊ लागल्याने आणि त्याला क्विंटलला सरासरी ५ हजार रुपये दर असल्याने शहरांमध्ये कांदा किलोमागे १00 रुपयांच्या आतच आहे.
मुंबई, ठाण्यात किरकोळ बाजारात मध्यम दर्जाचा कांदा ७0 ते ८0 रुपये किलोने विकला जात आहे. राज्यातील इतर शहरांमध्ये कांद्याने शंभरी पार केलेली नाही. तुर्कस्थानसह इतर देशांतून कांद्याची आयात झाल्याने भाव आटोक्यात आले आहेत. नाशिक जिल्ह्यात उमराणे बाजार समितीमध्ये उन्हाळ कांद्याला १२,५00 रुपयांचा क्विंटलला सर्वाधिक भाव मिळाला. सरासरी भाव ९000 रुपयांपर्यंत होते. लाल कांद्याला सरासरी ५,000 रुपये भाव मिळाला. लासलगाव बाजार समितीत लाल कांदा सरासरी ७,१00 रुपयाने विकला गेला.
कांद्याची सर्वाधिक आवक झालेल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत दरही सर्वाधिक मिळत आहेत. सोलापूरमध्ये २३ हजार ६०९ क्विंटल कांद्याची विक्री झाली. क्विंटलला सर्वाधिक १५ हजार रुपये इतका दर मिळाला. वाशीच्या एपीएमसी होलसेल मार्केटमध्ये कांद्याची आवक कमी झाल्याने दर वाढले आहेत, असे कांदा बटाट्याचे घाऊक व्यापारी मनोहर तोतलानी यांनी सांगितले. सध्या किरकोळ बाजारात कांद्याचा भाव १०० ते १२० रुपये किलो आहे.

भाववाढ होण्याची भीती
नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उन्हाळ कांद्याला प्रथमच ११ हजार ३00 रुपये प्रती क्विंटल असा दर मिळाला. अवकाळी पावसाने लाल कांद्याला फटका बसल्याने त्याचे उत्पादन घटले आहे. नवा कांदा अपेक्षित प्रमाणात बाजारात न आल्यास भाववाढ होण्याची भीती आहे. राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये उन्हाळ कांद्याची आवकही आता रोडावली आहे. शेतकऱ्यांनी साठविलेला उन्हाळ कांदा संपत आला आहे.

Web Title: Onion in retail for under Rs. 100; Incoming rates increase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :onionकांदा