राज्यभरात ५६ लाख ५९ हजार शेतक-यांचे आॅनलाइन अर्ज, अहमदनगरचे सर्वाधिक शेतकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2017 01:34 AM2017-09-24T01:34:45+5:302017-09-24T01:34:56+5:30

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेसाठी मुदतीत म्हणजे २२ सप्टेंबरच्या रात्रीपर्यंत राज्यातील ५६ लाख ५९ हजार ३९३ शेतकºयांनी आॅनलाइन अर्ज दाखल केले आहेत.

Online application of 56 lakh 59 thousand farmers, highest number of farmers in Ahmednagar | राज्यभरात ५६ लाख ५९ हजार शेतक-यांचे आॅनलाइन अर्ज, अहमदनगरचे सर्वाधिक शेतकरी

राज्यभरात ५६ लाख ५९ हजार शेतक-यांचे आॅनलाइन अर्ज, अहमदनगरचे सर्वाधिक शेतकरी

Next

- अरुण बारसकर ।

सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेसाठी मुदतीत म्हणजे २२ सप्टेंबरच्या रात्रीपर्यंत राज्यातील ५६ लाख ५९ हजार ३९३ शेतकºयांनी आॅनलाइन अर्ज दाखल केले आहेत.
राज्यातील थकबाकीदार व नियमित कर्ज भरणाºया शेतकºयांनी कर्जमाफीचा फायदा मिळावा यासाठी आॅनलाइन अर्ज दाखल केले आहेत. अर्ज भरण्याच्या मुदतीत आलेल्या अर्जांची लेखापरिक्षकांकडून तपासणी सुरू आहे. या अर्जांच्या गावनिहाय याद्या तयार केल्या जाणार असून त्याचे दोन आॅक्टोबर रोजी चावडीवाचन होणार आहे. त्यानंतर पात्र याद्या कर्जमाफीसाठी पात्र ठरणार आहेत.
कर्जमाफीसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली असून, आलेल्या अर्जांची तपासणी व अंतिम याद्या करण्याचे काम वेगाने सुरू आहे. तपासणीत आढळलेल्या त्रुटी पूर्ण करुन घेतल्या जातील. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्याप्रमाणे दिवाळी अगोदर कर्जाची रक्कम शेतकºयांच्या खात्यावर जमा केली जाईल, अशी माहिती सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.

मुंबईचे २५ हजार शेतकरी
अहमदनगर जिल्ह्यातून तीन लाख ३४ हजार ९२० शेतकºयांनी आॅनलाइन अर्ज दाखल केले आहेत. अकोला- एक लाख ३९ हजार ४२०, अमरावती- एक लाख ९७ हजार ७९३, औरंगाबाद- दोन लाख ६८ हजार ४०२, बीड- दोन लाख ७५ हजार ३५२, भंडारा-८९ हजार ६७२, बुलढाणा-दोन लाख ५२ हजार ४०९, चंद्रपूर- एक लाख ३९ हजार ६०९, धुळे- ९३ हजार ५४९, गडचिरोली- ४५ हजार ८२७, गोंदिया- ८२ हजार २९५, हिंगोली- एक लाख नऊ हजार ३८५, जळगाव-दोन लाख ८० हजार २७०, जालना- दोन लाख १५ हजार ४०७, कोल्हापूर- दोन लाख ७० हजार ५९०, लातूर- एक लाख ९८ हजार २०१, मुंबई- २३ हजार ७१५, मुंबई(उपनगर)- १६२०, नागपूर- एक लाख १० हजार ५२०, नांदेड- दोन लाख ६६ हजार १३३, नंदुरबार- ४९ हजार १७८, नाशिक- दोन लाख ६४ हजार ७५६, उस्मानाबाद- एक लाख ३९ हजार ५७७, पालघर-३६५३, परभणी- एक लाख ८० हजार ९४०, पुणे- दोन लाख ९८ हजार ६४, रायगड- २७ हजार ६९, रत्नागिरी- ४७ हजार १९३, सांगली- एक लाख ८८ हजार ३३३, सातारा- दोन लाख ४० हजार ७४७, सिंधुदुर्ग- ३६ हजार ५२४, सोलापूर- दोन लाख २० हजार ९९२, ठाणे- ७१ हजार २७७, वर्धा- ९८ हजार ४५५, वाशिम- एक लाख २९ हजार ७८१, यवतमाळ- दोन लाख ५२ हजार ७३४, इतर- १५ हजार ३१ असे ५६ लाख ५९ हजार ३९३ शेतकºयांनी आॅनलाईन अर्ज दाखल केले आहेत.

Web Title: Online application of 56 lakh 59 thousand farmers, highest number of farmers in Ahmednagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी