फेरपरीक्षेचा आॅनलाइन अर्ज सोमवारपासून
By admin | Published: June 13, 2015 03:55 AM2015-06-13T03:55:53+5:302015-06-13T03:55:53+5:30
राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीत नापास झालेल्या विद्यार्थ्यांना फेरपरीक्षेसाठी सोमवार, १५ जूनपासून आॅनलाइन अर्ज भरता येणार आहे. शिक्षणमंत्र्यांनी नापास विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये
मुंबई : राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीत नापास झालेल्या विद्यार्थ्यांना फेरपरीक्षेसाठी सोमवार, १५ जूनपासून आॅनलाइन अर्ज भरता येणार आहे. शिक्षणमंत्र्यांनी नापास विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये, म्हणून फेरपरीक्षा जुलैमध्ये घेण्याची घोषणा केली होती. त्याप्रमाणे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने शुक्रवारी फेरपरीक्षेच्या वेळापत्रकाची घोषणा केली.
नापास झालेले आणि पुनर्परीक्षार्थींना फेरपरीक्षा देता येणार आहे. काही
मोजकेच विषय घेऊन परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनाही या परीक्षेसाठी अर्ज भरता येणार असल्याची माहिती राज्य शिक्षण मंडळाने दिली. शिक्षण मंडळाच्या www.mahahsscboard.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर आॅनलाइन अर्ज करता येईल.