पुनर्परीक्षार्थींसाठी आॅनलाइन अर्ज शुक्रवारपासून

By admin | Published: December 24, 2014 01:59 AM2014-12-24T01:59:24+5:302014-12-24T01:59:24+5:30

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्चमध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी परीक्षेसाठी पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांना शुक्रवारपासून आॅनलाईन अर्ज भरता येणार आहेत

Online application for re-examination from Friday | पुनर्परीक्षार्थींसाठी आॅनलाइन अर्ज शुक्रवारपासून

पुनर्परीक्षार्थींसाठी आॅनलाइन अर्ज शुक्रवारपासून

Next

पुणे : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्चमध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी परीक्षेसाठी पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांना शुक्रवारपासून आॅनलाईन अर्ज भरता येणार आहेत. २ जानेवारीपर्यंत नियमित शुल्कासह अर्ज भरण्याची मुदत आहे.
पुनर्परीक्षार्थींसह नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार योजनेंतर्गत व काही विषय घेऊन प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांनाही आॅनलाईन अर्ज भरता येईल, अशी माहिती मंडळाचे सचिव कृष्णकुमार पाटील यांनी दिली.
नियमित शुल्कासह २६ डिसेंबर ते २ जानेवारी यादरम्यान अर्ज भरता येतील. तर ३ ते ८ जानेवारी या कालावधीत विलंब शुल्क भरून
अर्ज भरता येतील. हे अर्ज आॅनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येणार
असल्याने विद्यार्थ्यांनी अर्ज भरण्यासाठी संबंधित माध्यमिक शाळेशी संपर्क साधावा.
तसेच मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांच्या याद्या व प्रचलित शुल्काप्रमाणे बँक आॅफ इंडियाची चलनाची
प्रत दिलेल्या मुदतीतच विभागीय मंडळाकडे सादर करणे आवश्यक आहे, असे पाटील यांनी कळविले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Online application for re-examination from Friday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.