बारावीच्या सीबीएसई बोर्डाचा ऑनलाईन निकाल जाहीर

By Admin | Published: May 28, 2017 10:53 AM2017-05-28T10:53:47+5:302017-05-28T12:32:26+5:30

बारावीच्या सीबीएसई बोर्डाचा ऑनलाईन निकाल जाहीर झाला आहे. निकाल पाहण्यासाठी

Online CBSE board exam results | बारावीच्या सीबीएसई बोर्डाचा ऑनलाईन निकाल जाहीर

बारावीच्या सीबीएसई बोर्डाचा ऑनलाईन निकाल जाहीर

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 28 - बारावीच्या सीबीएसई बोर्डाचा ऑनलाईन निकाल जाहीर झाला आहे. निकाल पाहण्यासाठी http://www.cbseresults.nic.in/ या संकेतस्थळाला भेट द्या. सीबीएसईच्या १२ वी परीक्षेत पुन्हा एकदा मुलींनी बाजी मारली आहे. नोएडा येथील अमिटी इंटरनॅशनल स्कूलमधील रक्षा गोपाळ हिने ९९.६ टक्के मिळवत पहिला क्रमांक पटकावला आहे. तर चंदिगडमधील भूमी सावंत हिने ९९.४ टक्के मिळवत दुसऱ्या आणि चंदिगड येथील आदित्य जैन याने ९९.२ टक्के मिळवत तिसऱ्या क्रमांकावर स्थान मिळविले आहे.
 
आयसीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल उद्या दुपारी 3 वाजता जाहीर होणार आहे. तर महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या निकालाची अधिकृत तारीख सोमवार, २९ मे रोजी जाहीर करण्यात येणार आहे. आज फक्त ऑनलाइन निकाल जाहीर होईल. त्यामुळे विद्यार्थी-पालकांनी निकालाच्या प्रतीसाठी बोर्डाच्या कार्यालयात जाऊ नये, असे आवाहन सीबीएसई बोर्डातर्फे करण्यात आले आहे. यंदा देशभरातून सीबीएसईच्या बारावीच्या परीक्षेला10 लाख 98  हजार 420 विद्यार्थी बसले होते. 3 हजार 503 केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली होती.
 
रिझल्ट कसा पाहाल?
वेबसाईट ओपन करा. ( cbse.nic.in,  cbseresults.nic.innic.in )
त्यानंतर ‘CBSE 12th Result 2017’ या लिंकवर क्लिक करा.
आवश्यक माहिती भरा.
‘सबमिट’वर क्लिक करा. त्यानंतर रिझल्ट ओपन होईल.

Web Title: Online CBSE board exam results

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.