‘आॅनलाइन औषध विक्रीला परवानगी नाहीच’
By admin | Published: March 15, 2016 01:37 AM2016-03-15T01:37:03+5:302016-03-15T01:37:03+5:30
राज्य सरकारने आॅनलाइन औषध विक्रीला परवानगी दिलेली नाही आणि आॅनलाइन औषध विक्री होत असेल, तर संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन
मुंबई : राज्य सरकारने आॅनलाइन औषध विक्रीला परवानगी दिलेली नाही आणि आॅनलाइन औषध विक्री होत असेल, तर संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन अन्न व औषध प्रशासनमंत्री गिरीश बापट यांनी सोमवारी विधानपरिषदेत दिले.
राज्यात आॅनलाइन औषध विक्री होत आहे. या संबंधी कारवाई होत नसल्याचा प्रश्न विधानपरिषद सदस्य शरद रणपिसे यांनी लक्षवेधीद्वारे उपस्थित केला. यावर गिरीश बापट बोलत होते. ते म्हणाले, ‘आॅनलाइन औषध विक्रीची परवानगी देण्यात आलेली नाही. आॅनलाइन औषध विक्रीवर निर्बंध घालण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. चार महिन्यांत समितीचा अहवाल प्राप्त होईल.
औषधांची आॅनलाईन विक्री करणाऱ्या राज्याबाहेरील कंपन्यांवर कारवाई करणे कठीण असले, तरी याबाबत संबंधित राज्यांना कळवण्यात आले आहे, असेही बापट यांनी सांगितले. (प्रतिनिधी)