मराठी भाषेसाठी ऑनलाइन चळवळ

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2020 02:17 AM2020-02-19T02:17:46+5:302020-02-19T02:18:02+5:30

राजकीय पक्षांमुळे सर्वसामान्य मराठी माणूसही दुकानांच्या पाट्या देवनागरीत अ

Online movement for Marathi language | मराठी भाषेसाठी ऑनलाइन चळवळ

मराठी भाषेसाठी ऑनलाइन चळवळ

googlenewsNext

साधना गोरे

‘स्क्रीनवाचना’च्या आजच्या डिजिटल युगात मराठी भाषेची चळवळही मागे नाही. ‘मराठी प्रथम’ हे मराठी अभ्यास केंद्र या मराठी समाज, भाषा आणि संस्कृतीसाठी काम करणाऱ्या संस्थेचे डिजिटल नियतकालिक आहे. ‘ओळख भाषेची - मराठी महाराष्ट्राची’ असे मराठी प्रथमचे घोषवाक्य असून, मराठी भाषेशी निगडित - मराठी शाळा, उच्च शिक्षणातील मराठी, न्यायालयीन मराठीचा वापर, माहिती - तंत्रज्ञान, प्रशासनातील मराठीचा वापर, भाषाविज्ञान आदी विषयांसंबंधी अभ्यासपूर्ण लेख, असे वाचन, ज्ञानाची भूक भागवत मराठीचा प्रचार, प्रसार करणारे बरेच काही येथे वाचायला मिळते.

राजकीय पक्षांमुळे सर्वसामान्य मराठी माणूसही दुकानांच्या पाट्या देवनागरीत असणे, यालाच मराठीकरण समजायला लागला आहे, पण एखाद्या भाषेचा विकास करायचा मूलभूत मार्ग त्या भाषेतील शाळांच्या संख्येवर, शाळांच्या सक्षमीकरणावर अवलंबून असतो, या भाषातज्ज्ञांच्या इशाºयाकडे आपण सोईस्कररीत्या दुर्लक्ष करत आहोत, हे टाळायला हवे. मराठी शाळांमधील प्रयोगशील उपक्रमांचे आदानप्रदान घडवून आणण्यासाठी शिक्षणविषयक लेखांना मराठी प्रथममध्ये प्राधान्य दिले जाते. सोबतच शाळा-महाविद्यालयांमध्ये साजºया केल्या जाणाºया मराठीविषयक कार्यक्रमांचे वृत्तान्त, मराठीचा आग्रह धरणारे किस्से, राज्य सरकार - केंद्र सरकार यांची अनेक आस्थापने, खासगी संस्था, कंपन्या इ. ठिकाणी मराठीला डावलले जाणारे,
त्याविरुद्ध जाब विचारणारे अनुभव येथे वाचायला मिळतात.
मराठीची चळवळ, मराठी भाषेच्या संवर्धनाचे, अन्याय निर्मूलनाचे कार्य करणारे राज्यभरातील कार्यकर्ते मराठी प्रथमचा आधार आहे. मराठी भाषेच्या चळवळीतील हे विखुरलेले बिंदू जोडून त्यांची एक सशक्त साखळी करण्याचा मानस असल्याचे ‘मराठी प्रथम’चे संपादक ज्येष्ठ भाषाभ्यासक डॉ. प्रकाश परब यांनी सांगितले.
मराठी ही महाराष्ट्राची लोकभाषा आणि राजभाषा असली, तरी आजही ती ज्ञानभाषा नाही. मात्र, आपल्या सामूहिक व अविरत प्रयत्नांतून मराठी ज्ञानभाषा होऊ शकते. त्यासाठी तिचे सामाजिक, शैक्षणिक स्थान प्रथम भाषेचेच असले पाहिजे. मराठी आपल्यासाठी आज, उद्या आणि निरंतर प्रथम भाषाच असेल, असली पाहिजे. बाकी सर्व भाषा आपल्यासाठी कमीअधिक महत्त्वाच्या असल्या, तरी त्यांचे स्थान कायम दुसºया क्रमांकाचे असायला हवे, अशी ‘मराठी प्रथम’ची भूमिका असून हीच भूमिका प्रत्येक मराठी माणसाचीही असायला हवी.

मराठी ही महाराष्ट्राची लोकभाषा आणि राजभाषा असली, तरी आजही ती ज्ञानभाषा नाही. मात्र, आपल्या सामूहिक व अविरत प्रयत्नांतून मराठी ज्ञानभाषा होऊ शकते. त्यासाठी तिचे सामाजिक, शैक्षणिक स्थान प्रथम भाषेचेच असले पाहिजे, इतर भाषांचे स्थान कायम दुसºया क्रमांकाचे असायला हवे, हीच भूमिका प्रत्येक मराठी माणसाची असायला हवी.

(लेखिका मराठी अभ्यास केंद्रात कार्यकर्त्या आहेत)

Web Title: Online movement for Marathi language

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.