शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीसाठी आॅनलाइन प्रक्रिया?
By admin | Published: March 16, 2017 03:50 AM2017-03-16T03:50:27+5:302017-03-16T03:50:27+5:30
शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीसाठी आॅनलाइन प्रक्रिया राबविण्याच्या निर्णयाप्रत सरकार पोहोचले आहे, तसेच ३१ मेपूर्वीच सर्व बदल्या करण्याबाबतही निर्णय झाला आहे.
यवतमाळ : शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीसाठी आॅनलाइन प्रक्रिया राबविण्याच्या निर्णयाप्रत सरकार पोहोचले आहे, तसेच ३१ मेपूर्वीच सर्व बदल्या करण्याबाबतही निर्णय झाला आहे.
राज्यातील सर्व शिक्षणाधिकारी व शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींची मंगळवारी मुंबईत ग्रामविकास विभागाचे सचिव असीम गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. त्यात आंतरजिल्हा बदली धोरणासंदर्भात सांगोपांग चर्चा झाली.
आंतरजिल्हा बदली करताना विशेष संवर्गाला प्राधान्य देणे, तत्पूर्वी संवर्गनिहाय सेवाज्येष्ठता यादी तयार करणे, न्यायालयीन प्रकरणात न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे बदली करणे, सर्व माहिती राज्यस्तरावर संगणकीकृत करणे, त्यानुसार आॅनलाइन पद्धतीने आंतरजिल्हा बदली मागणी अर्ज व माहिती आॅनलाइन भरणे आदी विषयांवर चर्चा झाली.
आता या निर्णयावरून लवकरच शासन निर्णय पारित होण्याची शक्यत असल्याचे महाराष्ट्र
राज्य प्राथमिक शिक्षक समन्वय समितीचे सरचिटणीस मधुकर
काठोळे यांनी सांगितले. (शहर प्रतिनिधी)