आंतरराष्ट्रीय रिफ्लेक्सोलॉजी सप्ताहानिमित्त ऑनलाइन चर्चासत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2020 04:01 AM2020-09-14T04:01:55+5:302020-09-14T04:02:31+5:30
या सप्ताहात नि:शुल्क उपचार व प्रशिक्षण शिबिरे घेण्यात येतील. सप्ताहात सर्व चिकित्सक दररोज दोन तास आपापल्या केंद्र्रावर नि:शुल्क उपचार देतील.
औरंगाबाद : आंतरराष्ट्रीय रिफ्लेक्सोलॉजी परिषदेतर्फे आंतरराष्ट्रीय रिफ्लेक्सोलॉजी सप्ताहानिमित्त २१ ते २७ सप्टेंबर या काळात प्रख्यात चिकित्सकांचा सहभाग असणाऱ्या आॅनलाइन चर्चासत्राचे आयोजन केले आहे.
या सप्ताहात नि:शुल्क उपचार व प्रशिक्षण शिबिरे घेण्यात येतील. सप्ताहात सर्व चिकित्सक दररोज दोन तास आपापल्या केंद्र्रावर नि:शुल्क उपचार देतील. ५ वर्षांपूर्वी या महाअभियानाचा प्रारंभ लोकमत समूहाचे एडिटर इन चिफ राजेंद्र दर्डा यांच्या मार्गदर्शनाने झाला. हा उपक्रम प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचविण्यासाठी लोकमत मीडिया पार्टनरची महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडत आहे.
आंतरराष्ट्रीय रिफ्लेक्सोलॉजी जैन असोसिएशनसोबतच इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ होलीस्टिक सायन्स, भारतीय अॅक्युप्रेशर योग परिषद, इंटरनॅशनल नॅचरोपॅथी आॅर्गनायझेशन, इंटरनॅशनल सुजोक असोसिएशन, बिहार अॅक्युप्रेशर योग कॉलेज, आॅल इंडिया असोसिएशन आॅफ अॅक्युप्रेशर रिफ्लेक्सोलॉजी, सायंटिफिक इन्स्टिट्यूट आॅफ अल्टरनेटिव्ह
मेडिसीन अॅण्ड पॅरामेडिकल सायन्स कौन्सिल, नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ अॅक्युप्रेशर रिसर्च ट्रेनिंग अॅण्ड ट्रीटमेंट, हेरिटेज फाउंडेशन, विश्व चैतन्य अॅक्युप्रेशर थेरपी फाउंडेशन अॅण्ड रिसर्च सेंटर, अॅकॅडमी फॉर अॅक्युप्रेशर अॅण्ड अॅक्युपंक्चर यांचे सहकार्य लाभले आहे. सप्ताह यशस्वी करण्यासाठी इंटरनॅशनल कौन्सिल आॅफ रिफ्लेक्सोलॉजिस्टचे शिक्षण समितीप्रमुख डॉ. सिरील एंटोनी, रिसर्चप्रमुख अर्व फहल्विक, इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ होलीस्टिक सायन्सचे अध्यक्ष डॉ. प. ब. लोहिया, रिफ्लेक्सोलॉजी इन युरोपीय नेक्सासचे अध्यक्ष डॉ. इडयुराडो लुईस, भारतीय अॅक्युप्रेशर योग परिषदेचे अध्यक्ष डॉ. सर्वदेव प्रसाद गुप्ता
यांची समिती तयार केली
आहे. अधिक माहितीसाठी
६६६.्र१्नं२२ङ्मू्रं३्रङ्मल्ल.ङ्म१ॅ या संकेतस्थळावर भेट द्यावी, असे संयोजक जै. रि. अनिल जैन यांनी कळविले आहे.
गरजवंतांच्या
सेवेसाठी पुढे या
अॅक्युप्रेशर, रिफ्लेक्सोलॉजी, सुजोक, शिआत्सू, अॅक्युपंक्चर, योग, रेकी, जैन रिफ्लेक्सोलॉजी या औषधविरहित चिकित्सा पद्धती रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. चिकित्सकांनी या नि:शुल्क अभियानात सहभागी होऊन मानवसेवेसाठीचे हे कार्य यशस्वी करावे.
रिफ्लेक्सोलॉजी
म्हणजे काय?
शरीरात जे अवयव आहेत, त्यांचे प्रतिबिंब मानले जाणारे पॉइंट्स हात, पाय, कान व चेहºयावर असतात. त्यावर विशेष प्रकारे दबाव देऊन उपचार करणे म्हणजेच रिफ्लेक्सोलॉजी अॅक्युप्रेशर चिकित्सा होय.
२७ सप्टेंबरला आंतरराष्ट्रीय सभा
अॅक्युप्रेशर, रिफ्लेक्सोलॉजी, सुजोक, शिआत्सू, जैन रिफ्लेक्सोलॉजी या चिकित्सा पद्धतींच्या चिकित्सकांची सहावी राष्ट्रीय सभा २६ सप्टेंबर रोजी व आंतरराष्ट्रीय सभा २७ सप्टेंबर रोजी होईल. यामध्ये जगभरातील तज्ज्ञ मंडळी त्यांचे कार्य सादर करतील. यामुळे निश्चितच कार्यक्रमाचा लाभ घेणाºया प्रत्येकाच्याच ज्ञानात वृद्धी होईल. या कार्यक्रमाचे फेसबुक, यूट्युबवर प्रसारण केले जाईल.