मराठवाड्यात फक्त १० टक्केपाणीसाठा
By Admin | Published: January 14, 2016 02:18 AM2016-01-14T02:18:25+5:302016-01-14T02:18:25+5:30
मराठवाड्यात दिवसेंदिवस दुष्काळाची दाहकता वाढत आहे. प्रकल्पांतील पाणीसाठा झपाट्याने घटत असून, विभागातील ८४१ प्रकल्पांमध्ये केवळ १० टक्केपाणी शिल्लक आहे.
औरंगाबाद : मराठवाड्यात दिवसेंदिवस दुष्काळाची दाहकता वाढत आहे. प्रकल्पांतील पाणीसाठा झपाट्याने घटत असून, विभागातील ८४१ प्रकल्पांमध्ये केवळ १० टक्केपाणी शिल्लक आहे. मराठवाड्यातील सर्वात मोठ्या जायकवाडी प्रकल्पात केवळ ७.७३ टक्के साठा आहे.
मराठवाड्यात मोठे ११, मध्यम ७५ आणि लघु ७२६ प्रकल्प आहेत. याशिवाय गोदावरी नदीवर ११ आणि मांजरा नदीवर १८ बंधारे असून, एकूण ८४१ प्रकल्प आहेत. मोठ्या धरणांमध्ये केवळ ११, मध्यम प्रकल्पांमध्ये १० तर लघु प्रकल्पांमध्ये फक्त ६ टक्के पाणी आहे. गोदावरी नदीवरील बंधाऱ्यांमध्ये १३ आणि मांजरा नदीवरील बंधाऱ्यांमध्ये ६ टक्के पाणी आहे.
एकूण प्रकल्पांचा संकल्पित पाणीसाठा हा ७,९६७.८३ दलघमी एवढा आहे. परंतु या प्रकल्पांमध्ये सध्या केवळ ७७३.३९ दलघमी साठा आहे. ही पाणी पातळी तब्बल दहापट कमी आहे. मोठ्या अकरा प्रकल्पांपैकी नऊ प्रकल्पांची पातळी २५ टक्क्यांच्याही खाली आहे. केवळ दोन प्रकल्प २५ टक्क्यांच्या वर आहेत; परंतु त्यांचा पाणीसाठाही ५० टक्क्यांपेक्षा खूप कमी आहे. (प्रतिनिधी)