सांगली जिल्ह्यात १,३४६ लाभार्थींनाच कर्जमाफी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 05:25 AM2017-11-20T05:25:35+5:302017-11-20T05:25:40+5:30

सांगली जिल्ह्यात आतापर्यंत जिल्ह्यातील १,३४६ शेतकºयांना ६ कोटी ५२ लाख रुपयांची कर्जमाफी मिळाली.

Only 13346 beneficiaries have got debt waiver in Sangli district | सांगली जिल्ह्यात १,३४६ लाभार्थींनाच कर्जमाफी

सांगली जिल्ह्यात १,३४६ लाभार्थींनाच कर्जमाफी

Next

सांगली- जिल्ह्यात आतापर्यंत जिल्ह्यातील १,३४६ शेतक-यांना ६ कोटी ५२ लाख रुपयांची कर्जमाफी मिळाली. उर्वरित लाखो शेतकरी अजूनही अंतिम यादीच्या प्रतीक्षेत आहेत. जिल्ह्यात कर्जमाफीसाठी १ लाख ८६ हजार शेतकºयांचे अर्ज दाखल झाले आहेत.
यातील १ लाख ७१ हजार कर्जदारांची माहिती संकलित करण्यासाठी जिल्हा बँकेला, तर ५१ हजार कर्जदारांची माहिती देण्याचे आदेश अन्य बँकांना दिले होते. छाननीमध्ये यातील अनेक जण एकाच कुटुंबातील असल्यामुळे ही संख्या आणखी कमी होईल.
>साता-यात २४ शेतकºयांच्या खात्यावर ११ लाख जमा
सातारा जिल्ह्यात कर्जमाफीपोटी आतापर्यंत जिल्हा बँकेच्या माध्यमातून २४ शेतकºयांच्या बँक खात्यांवर ११ लाख रुपये जमा झाले आहेत.
जिल्ह्यातील २ लाख ४० हजार ७४७ शेतकºयांनी कर्जमाफीचे आॅनलाइन अर्ज भरले होते. यामध्ये जिल्हा बँकेच्या अंतर्गत असणाºया ९५३ संस्थांमधील २ लाख २० हजार ४०५ शेतकºयांचा समावेश आहे.
आतापर्यंत जिल्हा बँकेअंतर्गत असणाºया संस्थांमधील २४ शेतकºयांना कर्जमाफीचे पैसे मिळाले आहेत. हे पैसे संबंधित शेतकºयांच्या बँक खात्यांवर जमा झाले आहेत.

Web Title: Only 13346 beneficiaries have got debt waiver in Sangli district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी