लाखावर नागरिकांची सुरक्षा केवळ २२ पोलिसांच्या हाती
By admin | Published: June 7, 2014 10:40 PM2014-06-07T22:40:09+5:302014-06-07T22:51:00+5:30
६४ गावे असून १ लाखाच्या वर लोकसंख्या आहे. एवढया मोठया जनतेचे संरक्षण करण्यासाठी आज रोजी केवळ २२ पोलिस कर्मचारी पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत आहे. १
शिरपूर जैन : येथील पोलिस स्टेशन हे इंग्रज कालीन असून या पोलिस स्टेशन अंतर्गत ६४ गावे असून १ लाखाच्या वर लोकसंख्या आहे. एवढया मोठया जनतेचे संरक्षण करण्यासाठी आज रोजी केवळ २२ पोलिस कर्मचारी पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत आहे. १0 पोलिस कॉन्स्टेबल व ४ पोलिस हेड कॉन्स्टेबल ची कमतरता असल्याने या २२ कर्मचार्यांवर अतिरिक्त कामाचा ताण येत आहे. बुलडाणा जिल्हयाच्या सिमेपर्यंत हद्द असलेल्या शिरपूर पोलिस स्टेशन अंतर्गत ६४ गावांचा समावेश असून लाखो नागरीक या गावामध्ये वास्तव्यास आहेत. पोलिस स्टेशनची हद्द मोठी असल्याने येथे १ पोलीस निरिक्षक, १ पोलीस उप निरिक्षक व ३८ पोलिस कर्मचारी असणे आवयक आहे. परंतु मागील काही वर्षापासून येथे पोलिस कर्मचार्यांची सतत कमरता आहे. सध्या स्थितीत येथे १0 पोलिस कॉन्स्टेबल, ४ पोलीस हेड कॉन्स्टेबल. व इतर ४ कर्मचारी रजा अथवा इतर पोलिस कार्यालयात कर्तव्यावर पाठविण्यात आले आहेत. त्यामुळे ६४ गावातील लाखाच्यावर नागरिकांची सुरक्षा केवळ २२ कर्मचरी करताना दिसून येत आहेत. यामुळे कर्तव्यावर उपस्थित २२ पोलिस कर्मचार्यांच्या कामाचा अतिरिक्त ताण येत आहे. अशातच शिरपूर पोलिस स्टेशन आवारात असलेल्या निवासस्थानांची प्रचंड दुरवस्था झाल्याने त्यांना गावांमध्ये भाडयांच्या खोलीत रहावे लागत आहे.