महाराष्ट्रात फक्त २८१० जागांचे प्रवेश सीईटीमधून, अन्य जागांसाठी नीट अनिवार्य

By Admin | Published: May 24, 2016 04:25 PM2016-05-24T16:25:03+5:302016-05-24T16:28:43+5:30

केवळ सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेश राज्य सरकारच्या 'सीईटी'परीक्षेनुसार होतील. खासगी वैद्यकीय महाविद्यालयांना नीट मधून सवलत मिळालेली नाही.

Only 2810 seats in Maharashtra will be filled with CET and other mandatory seats are mandatory | महाराष्ट्रात फक्त २८१० जागांचे प्रवेश सीईटीमधून, अन्य जागांसाठी नीट अनिवार्य

महाराष्ट्रात फक्त २८१० जागांचे प्रवेश सीईटीमधून, अन्य जागांसाठी नीट अनिवार्य

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. २४ - केवळ सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेश राज्य सरकारच्या 'सीईटी'परीक्षेनुसार होतील. खासगी वैद्यकीय महाविद्यालयांना नीट मधून सवलत मिळालेली नाही. खासगी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशासाठी नीट परीक्षा द्यावीच लागेल असे केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी.नड्डा यांनी मंगळवारी स्पष्ट केले. महाराष्ट्रात सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात २८१० जागा आहेत. 
 
खासगी वैद्यकीय महाविद्यालयातील सरकारी जागा सीईटीव्दारे भरल्या जातील. अन्य जागांसाठी नीट परीक्षा सक्तीची राहील असे नड्डा यांनी स्पष्ट केले. राज्यात नीटमधून केवळ शासकीय महाविद्यालयांना सूट मिळाली आहे असे राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितले. 
 
आज सोमवारी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी नीट परिक्षा वर्षभराने पुढे ढकलण्याच्या अध्यादेशावर स्वाक्षरी केली. त्यानंतर सरकारने नीट परिक्षेसंदर्भातील गोंधळ दूर करण्यासाठी अध्यादेशातील तरतुदी स्पष्ट केल्या. 
 
सर्वोच्च न्यायालयाने देशातील सर्व वैद्यकीय शाखांमधील प्रवेश एकाच 'नीट' सामायिक प्रवेश परीक्षेव्दारे करण्याचा निकाल दिला होता. देशातील अनेक राज्यांनी यातून मार्ग काढण्याची केंद्र सरकारला विनंती केली होती. अखेर अध्यादेशाचा तोडगा काढण्यात आला. नीट परिक्षा वर्षभराने पुढे ढकलण्याचा अध्यादेश काढला. 

Web Title: Only 2810 seats in Maharashtra will be filled with CET and other mandatory seats are mandatory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.