राज्यात केवळ २९% पाणीसाठा; २४ जिल्हे रेड झाेनमध्ये, धरणक्षेत्र काेरडेच

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2023 05:27 AM2023-07-10T05:27:40+5:302023-07-10T05:28:05+5:30

जुलैच्या प्रारंभी पावसाचा जोर असला तरी गेल्या आठ दिवसांत पडलेला पाऊस सरासरीपेक्षा फार कमी आहे. 

Only 29% water storage in the maharashtra state; 24 districts in Red Zone | राज्यात केवळ २९% पाणीसाठा; २४ जिल्हे रेड झाेनमध्ये, धरणक्षेत्र काेरडेच

राज्यात केवळ २९% पाणीसाठा; २४ जिल्हे रेड झाेनमध्ये, धरणक्षेत्र काेरडेच

googlenewsNext

मुंबई - राज्यात मान्सून स्थिरावल्याला पंधरवडा लोटला तरी अद्यापही धरणातील पाणीसाठा २९ टक्क्यांवरच आहे. सर्वात कमी पाणीसाठा पुणे जिल्ह्यात १७.६६ टक्के इतका असून नागपूरमधील पाणीसाठा मात्र सर्वाधिक ४९ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.  सर्वाधिक भिस्त असलेल्या कोयना धरणातील पाणीसाठा ही १५.६५ टक्क्यांवर आहे.

राज्यात लहानमोठी २९८९ धरणे असून या धरणांत मिळून सर्व धरणांमध्ये मिळून रविवारपर्यंत २९. १५ टक्के पाणीसाठा असल्याचे जलसंपदा विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले. मागील वर्षी याच दिवशी पाणीसाठा ३८.२१ टक्के इतका होता. अमरावती भागात ३७.८२ टक्के, संभाजीनगर २४.५७ टक्के, कोकणात ४८.३७ टक्के, नागपूर ४४.६९ टक्के, नाशिक १८.६६ टक्के इतका पाणीसाठा आहे.

काेणत्या जिल्ह्यात किती टॅंकर?
नाशिक ६५ । सातारा ५५ । पुणे ४४ जालना ४४ । अहमदनगर ४३ 
जळगाव ३३ । बुलढाणा २३ 
अमरावती १४ । सोलापूर १० 
राज्यात अजूनही ४०१ गावे व ९८९ वाड्या तहानलेल्याच 

कमी पाऊस
(-५९ ते -२०%)
    जळगाव    -२८
    छ. संभाजीनगर    -२५
    बुलढाणा    -४५
    अहमदनगर    -२५
    बीड    -३६
    परभणी    -२४
    नांदेड    -३३
    पुणे    -२५
    सातारा    -४८
    सोलापूर    -४०
    धाराशिव    -३८
    अमरावती    -५०
    वाशिम    -४०
    यवतमाळ    -३१
    वर्धा    -१९
    नागपूर    -३३
    चंद्रपूर    -५४
    गडचिरोली    -४१
    कोल्हापूर    -३५

 

Web Title: Only 29% water storage in the maharashtra state; 24 districts in Red Zone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.