मेडिगड्डा धरणात जाणार केवळ ६० हेक्टर जमीन

By admin | Published: May 11, 2016 04:06 AM2016-05-11T04:06:11+5:302016-05-11T04:06:11+5:30

तेलंगण आणि महाराष्ट्राच्या सीमेलगत गोदावरी नदीवर उभारण्यात यावयाच्या मेडिगड्डा धरणासाठी गडचिरोली जिल्ह्यातील केवळ ६० हेक्टरच जमीन संपादित करण्यात येणार

Only 60 hectares land in Medigadda dam | मेडिगड्डा धरणात जाणार केवळ ६० हेक्टर जमीन

मेडिगड्डा धरणात जाणार केवळ ६० हेक्टर जमीन

Next

मुंबई : तेलंगण आणि महाराष्ट्राच्या सीमेलगत गोदावरी नदीवर उभारण्यात यावयाच्या मेडिगड्डा धरणासाठी गडचिरोली जिल्ह्यातील केवळ ६० हेक्टरच जमीन संपादित करण्यात येणार असल्याचे दोन्ही राज्यांच्या जलसंपदा मंत्र्यांच्या बैठकीत आज स्पष्ट करण्यात आले.
तेलंगणचे जलसंपदा मंत्री हरीश राव आणि महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यात आज सह्याद्री अतिथीगृहावर बैठक झाली. या धरणाची उंची १०० मीटर राहणार आहे. त्यासाठी महाराष्ट्रातील केवळ ६० हेक्टरच जमीन लागेल आणि एक इंचही वनजमीन संपादित केली जाणार नाही, असे महाजन यांनी बैठकीनंतर लोकमतला सांगितले. या धरणाच्या संपूर्ण खर्च तेलंगण करेल, असेही ते म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: Only 60 hectares land in Medigadda dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.